Amrishbhai Patel Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shirpur APMC Result: अमरिशभाईंचा करिष्मा; सर्व १८ जागा जिंकल्या!

Shirpur Bazar Samiti Result: महाविकास आघाडीला खातेही उघडता आले नाही.

Sampat Devgire

Shirpur APMC Election : येथील बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार अमरीशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष समर्थित पॅनलने स्पष्ट बहुमत संपादन केले असून प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीच्या पॅनलला खाते उघडण्यातही अपयश आले. सर्व १८ जागांवर भाजपच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला. (BJP leader Amrish Patel wins all seats in Shirpur APMC)

शिरपुर (Dhule) तालुक्याच्या राजकारणावरील पकड भाजपचे (BJP)आमदार अमरीशभाई पटेल (Amrishbhai Patel) यांनी आणखी घट्ट झाली. महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) बाजार समितीच्या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही.

भारतीय जनता पक्षाला शिरपूर बाजार समिती काबीज करण्यात प्रथमच यश मिळाले आहे. १९९० पासून आमदार पटेल यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली येथील सत्ता राखल्याचा इतिहास आहे. यापूर्वी २०१६ मध्ये काँग्रेसचे तत्कालीन आमदार अमरीशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस समर्थकांनी बाजार समितीवर सत्ता मिळवली. २०१९ मध्ये आमदार पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे यंदाची निवडणूक त्यांनी भाजपसाठी लढवली. त्यातही सर्व जागा पटकावून त्यांनी स्वत:चे वर्चस्व दाखवून दिले आहे.

येथील बाजार समितीच्या आरकेव्हीवाय गुदामात सायंकाळी पाचपासून मतमोजणीला सुरवात झाली. तहसीलदार महेंद्र माळी, मुख्य निवडणूक अधिकारी मनोज चौधरी, निवडणूक अधिकारी व्ही. बी. पापुलवाड, सहायक अधिकारी बी. एम. दुसाने, संजय ऐंडाइत, एस. एस. साळी, अमोल ऐंडाइत उपस्थित होते. व्यापारी मतदारसंघाच्या रुपाने पहिला तर विविध कार्यकारी संस्थेच्या रुपाने अखेरचा निकाल हाती आला. प्रत्येक विजयाच्या उद्घोषणेनंतर मतमोजणी केंद्राबाहेर उपस्थित आमदार पटेल समर्थकांनी मोठा जल्लोष करीत गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी केली. पोलिस निेरीक्षक ए. एस. आगरकर यांनी संबंधितांना विजयी मिरवणूक न काढण्याची तंबी दिली. (Bazar Samiti Election Results)

विजयी उमेदवार असे...

सोसायटी मतदारसंघ : सर्वसाधारण (सात जागा) : किरण गुजराथी, शांतीलाल जमादार, अरविंददास पाटील, कांतीलाल पाटील, चंद्रकांत पाटील, शिवाजी पाटील, विठोबा महाजन, सोसायटी महिला मतदारसंघ (दोन जागा) : मेघा पाटील, मनीषा मराठेसोसायटी इतर मागास प्रवर्ग (एक जागा) : प्रसाद पाटील, सोसायटी अनुसूचित जमाती (एक जागा) : कृष्णा पावरा, ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघ (दोन जागा) : लक्ष्मीकांत पाटील, आनंदसिंह राऊळ, ग्रामपंचायत अनुसूचित जाती : जमाती (एक जागा) : जगन पावरा, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक (एक जागा) : मिलिंद बोरसे- पाटील, व्यापारी मतदारसंघ (दोन जागा) : अर्पित अग्रवाल, सतीश जैन, हमाल-मापाडी मतदारसंघ : किरण कढरे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT