Dhule APMC News: आमदार कुणाल पाटील यांनी भाजपचा धुव्वा उडवला!

Dhule Bazar Samiti Election: आमदार कुणाल पाटील यांच्या काँग्रेसप्रणीत शेतकरी पॅनल एकतर्फी विजयी
Kunal Patil
Kunal PatilSarkarnama
Published on
Updated on

Dhule APMC Election Result: येथील रोमहर्षक, चुरशीच्या धुळे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसप्रणीत महाविकास आघाडीला ताकदीनिशी शह देण्यासाठी रिंगणात उतरलेल्या भाजप-भदाणे गटाचा सपशेल धुव्वा उडाला. काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वातील शेतकरी विकास पॅनलसह मतदारांनी भाजप-भदाणे गटाचे ‘रोडरोलर’ पंक्चर केले. (Congress wins in Dhule Apmc election & defeat BJP)

येथील (Dhule) बाजार समितीच्या निवडणुकीत (APMC election) काँग्रेसचे (Congress) आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) यांच्या शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी १६ जागा राखल्या. त्यांनी भाजपच्या (BJP) पॅनलचा दारुण पराभव केला.

Kunal Patil
Karad APMC Result: काँग्रेसच्या पॅनेलचे व्यापारी गटातील दोन्ही उमेदवार विजयी; बाळासाहेब पाटलांना धक्का

बाजार समितीच्या निवडणुकीतील सत्तासंघर्षात आमदार पाटील यांना शह देण्यासाठी भाजप आणि बोरकुंड येथील प्रथम लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे यांनी हातमिळवणी केली. भाजपचे खासदार डॉ. सुभाष भामरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्‍विनी पवार, महापौर प्रतिभा चौधरी, ज्येष्ठ गजानन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष देवरे, मनोहर भदाणे, माजी सभापती प्रा. अरविंद जाधव, बापू खलाणे, तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, राम भदाणे यांच्यासह भदाणे गटाचे प्रमुख व उमेदवार बाळासाहेब रावण भदाणे विरुद्ध एकाकी खिंड लढविणारे आमदार कुणाल पाटील यांच्यात वर्चस्वासह प्रतिष्ठेची लढत झाली.

चाणक्य नीतीचा अवलंब

निवडणुकीतील १८ पैकी बिनविरोध भाजपचे महादेव परदेशी (व्यापारी मतदारसंघ) आणि भागवत चितळकर (हमाल व तोलारी मतदारसंघ) या दोन जागा भाजप-भदाणे गटाला मिळू शकल्या. निकालानंतर बाजार समितीत काँग्रेसप्रणीत महाविकास आघाडीची विजयी सभा झाली. तीत मतदारांनी धनशक्तीच्या बळावर निवडणूक जिंकता येत नाही, असा संदेश देत शेतकरी विकास पॅनलच्या बाजूने कौल दिल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. ‘रोडरोलर’ चिन्ह घेऊन काँग्रेसप्रणीत शेतकरी विकास पॅनलला भुईसपाट करण्याचे भाजप-भदाणे गटाचे मनसुबे होते; परंतु निवडणुकीच्या शेवटच्या दोन दिवसांत चाणक्य नीतीचा अवलंब करीत भाजप-भदाणे गटप्रणीत परिवर्तन पॅनलचे रोडरोलर कधी पंक्चर झाले, ते त्यांच्या मातब्बर नेत्यांना कळलेच नाही.

Kunal Patil
Nandgaon APMC Election: आमदार सुहास कांदेंनी महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला!

विजयी उमेदवार असे

शेतकरी विकास पॅनलचे विजयी १६ उमेदवार असे (कंसात मते) ः गुलाबराव कोतेकर (८५०), हृषीकेश ठाकरे (८४६), यशवंत पाटील (८२७), नानासाहेब पाटील (८२२), बाजीराव पाटील (८०४), विशाल पाटील (८०२), गंगाधर माळी (७७३), विश्‍वास शिंदे (८८९), छाया पाटील (८८१), नयना पाटील (८८४), कुणाल दिगंबर पाटील (८९० मते), धर्मा पाटील (६९४), योगेश पाटील (७२७), संभाजी देवरे-राजपूत (७२८), सुरेश भिल (७०३), विजय चिंचोले (बिनविरोध). तसेच विरोधी गटातील बाळासाहेब भदाणे, शालिनी पाटील, विजय गजानन पाटील, रावसाहेब गिरासे, अजय माळी हे प्रमुख उमेदवार पराभूत झाले.

Kunal Patil
Nandgaon APMC News : छगन भुजबळ यांनी सुहास कांदेची पुरती दमछाक केली

चाळीस वर्षांपासून अबाधित सत्ता

धुळे तालुक्याच्या राजकारणात बाजार समितीवरील सत्ता महत्त्वाची ठरली आहे. काही स्थित्यंतरांनंतरही काँग्रेसचे नेते माजी मंत्री रोहिदास पाटील आणि आता आमदार कुणाल पाटील या पितापुत्राच्या नेतृत्वाखाली गेल्या ४० वर्षांपासून बाजार समितीवर काँग्रेसने अबाधित सत्ता राखली आहे. १९८३ पासून पाटील पितापुत्राचे पॅनल विजयी होत आहे. रविवारी निकालानंतर शेतकरी विकास पॅनलचे सर्व १५ उमेदवार २२५ पेक्षा अधिक मताधिक्क्याने विजयी झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com