Nandgaon APMC News : छगन भुजबळ यांनी सुहास कांदेची पुरती दमछाक केली

बाजार समितीच्या निवडणुकीत बहुतांशी सदस्यांचा निसटता पराभव झाला.
Suhas Kande & Chhagan Bhujbal
Suhas Kande & Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Bhujbal-Suhas kande politics : नांदगाव बाजार समितीच्या निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे सत्ता व सर्व शक्तीनिशी तयारी करीत होते. तेव्हा विरोधक मात्र विखुरलेले होते. माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शेवटच्या क्षणी त्यात भाग घेत निवडणुक उभी केली. त्यामुळे उत्साहात असलेल्या आमदार कांदे यांनी निवडणूक जिंकली, मात्र त्यांची दमछाक झाली. कांदे विरोधकांमध्ये उत्साह निर्माण झाला, असे काँग्रेसचे माजी आमदार अनिल आहेर यांनी सांगितले. (Chhagan Bhujbal`s Involvement in Nandgao APMC create boost in Mahavikas Aghadi)

नांदगाव (Nandgaon) तालुक्यातील राजकारण व निवडणुका, अगदी गाव पातळीवरील सोसायटयांत एक वेगळे राजकारण करून वातावरण बिघडवण्याचे काम शिंदे गटाचे (Eknath Shinde) आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी केले. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या मदतीने आम्ही त्याला उत्तर दिले, असे काँग्रेसचे (Congress) आमदार अनिल आहेर (Anil Aher) म्हणाले.

Suhas Kande & Chhagan Bhujbal
Nandgaon APMC Election: आमदार सुहास कांदेंनी महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला!

नांदगाव बाजार समिती निवडणूक सध्या सगळीकडे चर्चेचा विषय आहे. या निवडणुकीत शिवसेना- शिंदे गटाला सत्ता मिळाली मात्र काही जागा थोड्या मतांनी आल्या. या निवडणुकीत अतिशय कमी कालावधीत आपली यंत्रणा राबवून भुजबळ यांनी विद्यमान आमदार कांदेना चांगलाच घाम फोडल्याचे बघावयास मिळाले.

विशेष म्हणजे सुहास कांदे यांच्या गटातील संभाव्य चेअरमन पदाचे बलाढ्य उमेदवार विलास आहेर हे पराभूत झाल्याने मोठा दणका बसला आहे. खुद्द कांदे यांनी त्याबाबत गड आला पण सिंह गेला अशी प्रतिक्रीया दिली आहे.

Suhas Kande & Chhagan Bhujbal
Malegaon APMC News : पालकमंत्री दादा भुसे यांच्या पराभवामागे शिंदे गट?

या निवडणुकीत छगन भुजबळ ऐनवेळी नियोजन करत निवडणुकीला सामोरे गेले. विशेषतः माजी खासदार समीर भुजबळ यांनी अतिशय परिश्रम घेतले. त्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा अतिशय कमी फरकाने पराभव झाला. अतिशय चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत आमदार सुहास कांदेची प्रचंड दमछाक झाल्याची बघावयास मिळाली.

नांदगाव तालुक्यात एकनाथ शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी सातत्याने सामोपचाराचे राजकारण बाजुला ठेऊन धाक व दडपशाहीचा वापर केल्याचा आरोप होत आहे. त्याने तालुक्यात राजकीय कार्यकर्ते दबावाखाली आले होते. या निवडणुकीत नांदगाव तालुका कोणा एका आमदाराकडून सत्तेच्या जोरावर मिंधा करता येणार नाही. लोकशाही मार्गानेच राजकारण पुढे जाईल असा संदेश तालुक्यतातील विविध पक्षाचे नेते व सामान्य कार्यकर्ते यांनी दाखवून दिले आहे. कार्यकर्त्यांत उत्साह व राजकीय ईर्षा निर्माण करण्यात ही निवडणूक महत्त्वाची ठरेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com