Chandrakant Patil
Chandrakant Patil  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chandrakant Patil News: '' मला अडचणीत आणताना विरोधक थकतात..''; चंद्रकांत पाटील असं का म्हणाले?

सरकारनामा ब्यूरो

Bjp Leader Chandrakant Patil : भाजप नेते व उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी महापुरुषांविषयी आक्षेपार्ह विधान केलं होतं. यानंतर पाटील यांना तीव्र रोषाला सामोरे जावे लागते. तसेच पिंपरी चिंचवड येथील एका कार्यक्रमात त्यांच्यानंतर शाईफेक देखील करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर आता चंद्रकांत पाटील यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे.

जळगाव येथे एका कार्यक्रमासाठी चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले, मी बोलल्यानंतर कुणीतरी त्याची स्कीम तयार करत याने काही बोलल्यानंतर त्याचा अर्थ लावायचा असा मस्त प्रोग्रॅम तयार होतो, आणि त्याला इको क्रिएट करणं म्हणतात,आणि हा बोलला ,तो बोलला. पण मी असं बोललो की काय? असं म्हणत संध्याकाळपर्यंत मीच कन्फ्यूज होतो.

पण माझीही मोठी यंत्रणा आहे. माझं प्रत्येक भाषण कॅसेट होतं. त्याच्यामुळे विरोधक मला अडचणीत आणताना थकतात बिचारे ,मला त्यांची कीव येते. दर दोन महिन्यांनी काहीतरी काढत असतात अशी मिश्किल टिप्पणी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करताना महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा उभ्या केल्या असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटले. त्यांच्या या विधानाचा निषेध करण्यात आला होता. या विधानाचा विरोध म्हणून पिंपरीमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली.

पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्यांवर हत्या करण्याचा गुन्हा दाखल केला गेला. कलम 307 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसंच 11 पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं.यावर विरोधकांनी टीका केली. त्यानंतर आता या पोलीस अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत रूजू करून घेण्यात आलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT