ShivSena Politics: '' उध्दव ठाकरेंना सध्या अंधारेंच्या पदराचा सहारा घ्यावा लागतोय!''; शिंदे गटाच्या नेत्याची बोचरी टीका

Shinde group Leader on Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना कुठे आहे?
Uddhav Thackeray, Sushma Andhare, Ramdas Kadam
Uddhav Thackeray, Sushma Andhare, Ramdas Kadam Sarkarnama
Published on
Updated on

Ramdas Kadam News : '' जी अंधारेबाई हिंदू देवतांवर प्रचंड टीका करते. तिच्या पदराचा सहारा उद्धव ठाकरेंना घ्यावा लागतोय. वरती बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला काय वाटत असेल? याची पर्वा आणि जाणीवही त्यांना नाही. त्यांच्यासोबत आता कुणीही राहिलं नाही. त्यामुळे जो येईल त्याला सोबत घ्यायचं एवढाच त्यांचा एककलमी कार्यक्रम चालला आहे..''' अशी बोचरी टीका माजी मंत्री व शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उध्दव ठाकरेंवर केली आहे.

आंबेडकरी चळवळीतील नेत्या सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर दसरा मेळावा आणि महाप्रबोधन यात्रेद्वारे राज्य पिंजून काढत शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीकेची झोड उठवली होती. याचवेळी ठाकरे गट आणि वंचितसोबतच्या युतीची जोरदार चर्चा आहे.एकीकडे प्रकाश आंबेडकरांनी ठाकरे गटासोबतची युती जाहीर केल्यानंतरही उध्दव ठाकरे व त्यांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. या दोन्ही मुद्द्यांचा आधार घेत शिंदे गटातील नेत्यानं ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.

Uddhav Thackeray, Sushma Andhare, Ramdas Kadam
Latur News : "लातुरात देशमुखांची गढी.." ; भाजपच्या वाटेवर जाण्याच्या चर्चेवर देशमुखांचे स्पष्टीकरण

रामदास कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उध्दव ठाकरे व प्रकाश आंबेडकर युती आणि सुषमा अंधारेंवरुन उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. कदम म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता प्रकाश आंबेडकर यांच्याशी ते युती करू पाहत आहेत. आता आणखी कुणी मिळतंय का? हे उद्धव ठाकरेंनी दिवा लावून शोधावं अशा शेलक्या शब्दांत रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

Uddhav Thackeray, Sushma Andhare, Ramdas Kadam
Satyajeet Tambe News : 37 वर्षांपूर्वी मामांनी जे केलं, तेच आज सत्यजीत तांबेंनी केलं!

प्रकाश आंबेडकर आणि सुषमा अंधारे यांच्यामुळे उद्धव ठाकरेंची ताकद प्रचंड वाढणार आहे. यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना कुठे आहे? हे लोकं शोधत बसतील. आता खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे यांचं पितळ उघडं पडतंय, हे चांगलं आहे. त्यांना खूप शुभेच्छा, अशी उपरोधिक टीका कदम यांनी केली.

उध्दव ठाकरे लवकरच वंचितसोबतच्या घोषणा करणार

ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची अधिकृत घोषणा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख लवकरच करण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. त्यानंतर आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत आमची ठाकरे गटासोबतची युती झालेली असून आमच्या भूमिकेत आम्ही कोणताही बदल केलेला नाही.

तसेच जागावाटपासह सर्व गोष्टी निश्चित झाल्या असून फक्त ठाकरे गट व वंचित युतीची अधिकृत घोषणा बाकी आहे. आम्ही आमचा निर्णय घेतला असून आता उध्दव ठाकरेंनी आपली भूमिका जाहीर करावी असं विधानही आंबेडकर यांनी केलं होतं. त्यानंतर उध्दव ठाकरे वंचित सोबतच्या युतीची उद्या पत्रकार परिषदेत घोषणा करण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com