Chandrashekhar Bavankule & Ketaki Chitale Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

चंद्रशेखर बावनकुळे यांनी केतकी चितळेचे कान टोचले!

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आक्षेपार्ह टिपणी करणे गैर असल्याचे म्हटले आहे.

Sampat Devgire

नाशिक : कोणत्याही व्यक्ती विरोधात आक्षेपार्ह टिका टिपणी करमे योग्य नाही. टिका करण्याचा एक स्तर असतो. तो सोडता कामा नये. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा (freedom of expression) गैरवापर करणे योग्य नाही, या शब्दात भाजप (BJP) नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी केतकी चितळे (Ketaki Chitale) प्रकरणावर प्रतिक्रीया व्यक्त केली. एकंदर भाजपने यासंदर्भात आपले हात झटकले आहे. (BJP leader Chandrashekhar Bavankule criticised Ketaki Chitale on her criticism on Sharad Pawar)

श्री. बावनकुळे नाशिक येथे बोलत होते. केतकी चितळे वादावर बोलताना त्यांनी केतकी वर टीका केली. कोणाविरुद्ध ही आक्षेपार्ह टिप्पणी करणे चुकीचे आहे. महाराष्ट्र हा सुसंस्कृत आहे व राज्याची संस्कृती जपणे आपले कर्तव्य आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले तरी त्याचा गैरवापर होता कामा नये.

ते म्हणाले, मात्र भाजप नेते व पदाधिकाऱ्यांनी विरोधात कोणी टीकाटिप्पणी केली तर कारवाई होत नाही मात्र शरद पवार यांच्या विरोधात टिपणी झाल्यानंतर तत्काळ गुन्हे दाखल होत असल्याचे देखील त्यांनी खंत व्यक्त केली. अमोल मिटकरी यांच्यावर अद्याप कारवाई झाली नाही. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पोस्ट टाकणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

काय आहे चितळे प्रकरण...

केतकी चितळे नवी मुंबईत राहते. ती अभिनय करते असे बोलले जाते. ती अभिनेत्री असल्याबाबत फारसी माहिती कोणाला नाही. या युवतीने ट्वीटरवर प्रतिक्रीया दिली. त्यात तीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी अत्यंत हीन भाषेचा वापर केला. श्री. पवार यांच्यावर व्यक्तीगत टिका केली. त्यामुळे संतप्त प्रतिक्रीया उमटल्या. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर निषेध व्यक्त करीत पोलिसांकडे कारवाईची मागणी केली. तीला शनिवारी नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले.

....

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT