Radhakrishna Vikhe Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe : काँग्रेस सरकारकडून गणपती आरतीवर बंदी; मंत्री विखेंचा संताप

Pradeep Pendhare

Ahmednagar News : भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांनी संगमनेरमधून कर्नाटकमधील काँग्रेस सरकारवर धार्मिक मुद्यावरून निशाणा साधताना, राज्यातील काँग्रेस नेत्यांना घेरलं आहे.

"काँग्रेस सरकार असलेल्या कर्नाटकमध्ये गणपती आरतीवर बंदी घातली आहे. यातून काँग्रेसची संस्कृती समोर आली आहे. आरती करत फिरणारे काँग्रेस नेत्यांनी यावर खुलासा करावा", अशी मागणी मंत्री विखे यांनी केली.

अहमदनगर जिल्ह्याचा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेस (Congress) नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला असलेल्या संगमनेर मतदार संघातील सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी दिल्या. यावेळी मंत्री विखे यांनी काँग्रेसच्या धार्मिक विचारांवर हल्ला चढवला. यासाठी कर्नाटकमधील काँग्रेस सरकार हिंदूच्या धार्मिक सणांना कशी आडकाठी आणत आहेत, यावर भाष्य केले. मंत्री विखे सार्वजनिक मंडळांना भेटी देत असताना, या योजनेच्या लाभार्थ्यांनी मंत्री विखेंबरोबर सेल्फी घेतली. यावेळी मंत्री विखेंनी लाभार्थ्यांनी संवाद साधला.

राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) म्हणाले, "कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने गपणतीच्या आरतीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे काँग्रेसची संस्कृती समोर आली. आता आरती करत फिरणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी यावर खुलासा केला पाहिजे". अन्यथा गणपती सुद्धा तु्म्हाला माफ करणार नाही, अशी खोटक टिप्पणी मंत्री विखेंनी केली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संगमनेरमध्ये लोकप्रिय झाली आहे.

राहुल गांधींवर निशाणा

राहुल गांधी यांनी परदेशात देशाच्या संस्कृती, परंपरेवर भाष्य करत आहेत. यावर मंत्री विखेंनी निशाणा साधला. विखे म्हणाले, "काँग्रेसने देशाची संस्कृती आणि परंपरेला कधीत बाजूला सारलं आहे. त्यामुळे काँग्रेस नेते परदेशात जाऊन वाचाळपणा करत आहेत. आरक्षणाचा विरोध, असो किंवा गणपती आरतीवर बंदीचा निर्णय असो, यातून काँग्रेस संस्कृती खरा चेहरा समाजासमोर आला आहे". आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारच सत्तेवर येणार असल्याचा दावा मंत्री विखेंनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT