Radhakrishna Vikhe 2 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe : मंत्री विखेंचे 'मिसळ पाॅलिटिक्स'; थोरातांना घेरण्याच्या तयारीत...

Balasaheb Thorat Sangamner tour of Radhakrishna Vikhe increased : भाजप नेते राधाकृष्ण विखे यांनी आठवड्याभरात संगमनेर तालुक्यात सलग तीन दौरे झाले. यावेळच्या दौऱ्यात त्यांनी कार्यकर्त्यांबरोबर संगमनेरी मिसळ खाण्याचा आनंद घेतला. त्यांचे संगमनेरमधील 'मिसळ पाॅलिटिक्स' चर्चेत आले आहे.

Pradeep Pendhare

Ahmednagar News : भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांचे अलीकडच्या काळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर बालेकिल्ल्यात दौरे वाढलेत. गेल्या आठवड्यात तीन वेळा संगमनेरमध्ये येऊन गेले. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना, जुन्या आणि तरुण कार्यकर्त्यांची खुबीने सांगड घालत आहेत.

संगमनेरमध्ये आज सकाळीच हजेरी लावत जुन्या जाणत्या, तरुण कार्यकर्त्यांची भेट घेत 'संगमनेरी मिसळ'ची चव चाखत आगामी विधानसभा निवडणुकीचा कल जाणून घेतला. मंत्री विखे यांचे हे 'मिसळ पाॅलिटिक्स' संगमनेरमध्ये विधानसभा निवडणुकीत नक्कीच उलथापालथ घडवून आणणार, अशी चर्चा रंगू लागली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री राधाकृष्ण विखे यांनी संगमनेर तालुक्यावर चांगलेच लक्ष केंद्रीत केले असून आता भाजप (BJP) कार्यकर्ते, पदाधिकारी, जुने-जाणते ज्येष्ठ आणि विखे कुटुंबियांशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांच्या भेटीवर लक्ष केंद्रीत केले आहे. आठवडाभरात मंत्री विखेंचा संगमनेर तालुक्यातील सलग तीन दौरे केले. कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना संगमनेरमध्ये सक्रिय केले.

आगामी विधानसभा निवडणुकीची संगमनेरमध्ये चाचपणी मंत्री विखे करत असून, बाळासाहेब थोरातांना घेरण्याची ही रणनीती असल्याचे बोलले जात आहे. मंत्री विखे संगमनेरमध्ये वाढवलेल्या दौऱ्यावर अनेक राजकीय अर्थ निघत असले, तरी बाळासाहेब थोरातांना (Balasaheb Thorat) घरण्याच मैदानावर घेरण्याचा राजकीय डाव लपून राहिलेला नाही. त्यामुळे मंत्री विखे यांचे संगमनेरमधील दौरे चर्चेत आहेत.

निळवंडे येथे जलपूजन आणि पाणी सोडण्याच्या कार्यक्रमाला जाताना संगमनेर तालुक्यातील कार्यकर्ते याच हॉटेलमध्ये एकत्रितपणे मिसळ खाण्यासाठी थांबले असल्याचे मंत्री विखे यांना समजले. कार्यकर्त्यांनी देखील मंत्री विखे यांना मिसळ खाण्याचा आग्रह धरला. यानंतर मंत्री विखे यांनी देखील कार्यकर्त्यांचा आग्रह मोडला नाही. आपल्या वाहनांचा संपूर्ण ताफा हाॅटेलकडे वळवला आणि कार्यकर्त्या समवेत त्यांनी संगमनेरी मिसळ खाण्याचा आनंद घेतला.

मिसळ खाताना त्यांनी कार्यकर्त्यांना संगमनेर तालुक्यातील राजकारणाबाबत काही टिप्सही दिल्या. संगमनेरची प्रसिध्द असलेली जोशींची जिलेबी त्यांनी आवर्जून मागून घेतली. जोशीच्या हाॅटेलमध्ये जिलेबी बाळासाहेब विखे पाटील यांची आवड होती, अशी आठवण करून देत दिल्लीमधील अनेक नेत्यांना जिलेबी आवर्जून खाऊ घातल्याचा किस्सा मंत्री विखे यांनी कार्यकर्त्यांना सांगितला.

सुजय विखेंसाठी बांधणी?

मिसळ, ताक आणि जिलेबी, असा आस्वाद घेत मंत्री विखे यांनी साधलेल्या संवादाची खमंग चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. आठवड्याभरात सलग तीनवेळा मंत्री विखे यांनी संगमनेर तालुक्यात झंझावती दौरा केला. माजी खासदार सुजय विखे यांनीही संगमनेरमधील गुंजाळवाडी येथे येवून विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत सुतोवाच केलाय. त्यामुळे सुजय विखे यांनी संगमनेरमधून विधानसभा निवडणूक लढविण्यासंदर्भात व्यक्त केलेल्या भावनांचा निश्चित विचार करू. याबाबत महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करण्याबाबत मंत्री विखे यांनी केलेली पुष्टी सुध्दा महत्वपूर्ण ठरते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT