Shivaji Kardile, Prajakt Tanpure Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivaji Kardile News : निळवंडेच्या पाण्यावरून पुन्हा श्रेयवादाची लढाई; कर्डिलेंचा तनपुरेंवर निशाणा

Pradeep Pendhare

Nagar News : जलपूजनच्या कार्यक्रमानिमित्ताने नगर जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष, माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यात सत्ता असताना राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली. तरी देखील ते कामे करण्यात अपयशी ठरले. सरकार आमचे मात्र फलकबाजी करून तनपुरे श्रेय घेत असल्याचा टोला कर्डिले यांनी लगावला आहे. (Shivaji Kardile News)

राहुरी तालुक्यातील निंभेरे-कानडगाव परिसरात अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले निळवंडे धरणाच्या कालव्याद्वारे आज पाणी मिळाले. या पाण्याचे जलपूजन शिवाजी कर्डिले आणि धनश्री विखे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना कर्डिले म्हणाले, "निळवंडे धरणाचे पाणी निंभेरे-कानडगावमधील शेतकऱ्यांना पाहायला मिळाले, हा क्षण मनाला समाधान देणारा आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe), खासदार सुजय विखे यांच्या माध्यमातून वन विभागाची कालव्यासाठी परवानगी घेतली.

युती सरकारच्या काळात या कामाला निधी उपलब्ध केला होता. त्यावेळी अकोले येथे काम करण्यास अडचण होती. म्हणून टेल टू हेड काम सुरू केले. राज्यात पुन्हा सत्ता आल्यानंतर काम जोमाने पूर्ण केले. पाणी जात असताना परिसरातील सर्व ओढे-नाले भरून दिले जातील, असे कर्डिले यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यात सत्ता असताना यांना राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली. तरी देखील विकास कामे करण्यात ते अपयशी ठरले. आमचे सरकार असल्याने आम्ही कामे मंजूर करून आणतो आणि तनपुरे (Prajakt Tanpure) मात्र फलक लावून श्रेय घेण्याचे काम करतात. 53 वर्षांपासून प्रतिक्षा असलेल्या निळवंडे धरणाचे पाणी आज शेतकऱ्यांना पाहायला मिळाल्याचा आनंद होत असल्याचेही शिवाजी कर्डिले म्हणाले.

शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आज आनंद पहायला मिळाला, याचे समाधान वाटते. पाण्यासाठी 53 वर्षे संघर्ष करावा लागला. परंतु लवकरच हा भाग आता सुजलाम् सुफलाम् होईल, अशी अपेक्षा धनश्री विखे यांनी व्यक्त केली. माजी तालुकाध्यक्ष नानासाहेब गागरे यांनी आमचा वनवास संपल्याची भावना व्यक्त केली.

(Edited By - Rajanand More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT