Political News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष अद्याप उमेदवारांचा शोध घेत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अजूनही जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे त्यांचे उमेदवार अजून निश्चित झाले नाहीत. मात्र, नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शांतिगिरी महाराज यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. निवडणुकीत उतरण्याची घोषणा केलेल्या शांतिगिरी महाराज यांनी कार्यकर्त्यांचे निवडणूक प्रशिक्षण सुरू केले आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित. (Lok Sabha Election 2024 )
10 आणि 11 फेब्रुवारीला नाशिकच्या श्रद्धा लॉन्स येथे जय बाबाजी भक्त परिवाराचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी अनुयायांनी पूर्णवेळ सहभागी होण्याच्या तयारीने यावे, अशा सूचना करण्यात आली आहे. या मेळाव्यात आगामी निवडणुकीत उमेदवारीच्या भूमिकेसह थेट बूथ यंत्रणा व त्याचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे अन्य पक्ष आणि इच्छुक कोणत्या दिशेला जावे या गोंधळात असताना शांतिगिरी महाराज (ShantiGiri Maharaj) यांनी मात्र अतिशय गांभीर्याने निवडणुकीची तयारी सुरू करून विरोधकांना थेट आव्हान दिले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नाशिक (Nashik) लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीचे राजकारण तापले आहे. विविध इच्छुकांनी गाठीभेटी आणि पक्षाकडे उमेदवारीसाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांचे सोशल मीडियातून खच्चीकरण करण्याचा प्रयत्न देखील नुकताच समोर आला आहे. या स्थितीत मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे यांच्या मेळाव्यानंतर अध्यात्मिक क्षेत्रातील शांतिगिरी महाराज यांनीही थेट निवडणुकीत उतरण्याची घोषणा करून टाकली आहे.
शांतिगिरी महाराजांच्या निवडणुकीची तयारी देखील अन्य राजकीय पक्षांपेक्षा हटके असणार आहे. त्यासाठी त्यांच्या ओझर येथील आश्रमातून ड्रेस कोड, वेळापत्रक प्रशिक्षण, आगामी कार्यक्रम आणि निवडणुकीत कसा प्रचार करायचा याची रणनीती ठरवली जात आहे . प्रशिक्षण शिबिरात सहभागी होणारे अनुयायी हे ड्रेस किट खरेदी करून नोकरी अथवा अन्य व्यवसायातून रजा घेऊन लोकसभेची जोरदार तयारी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
शांतिगिरी महाराज यांची व्यवस्था सांभाळणाऱ्यांनी 'फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन' असा संदेश दिला आहे. निवडणुकीचे एक पत्र तयार करण्यात आले आहे. मतदारसंघातील प्रत्येक घरात येत्या आठ दिवसात ते पत्र पोहोचणार आहे. स्वतः अनुयायी आणि त्यांचे आप्त स्वकीय आणि शेजारी यांना प्रचारात कसे सहभागी करायचे यांचे नियोजन आणि व्यवस्था शांतिगिरी महाराजांच्या प्रचार यंत्रणेने केली आहे.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.