MLA Padvi in Savarkar Gaurav Yatra Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Savarkar Gaurav Yatra : राजकीय स्वार्थापोटी बदनामीचे षडयंत्र!

आमदार पाडवी यांच्या नेतृत्वाखाली तळोदा शहरात भाजपची स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा

Sampat Devgire

Veer Savarkar Gaurav Yatra : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा राहुल गांधी यांच्याकडून वारंवार अपमान केला जात आहे. त्याच्या निषेधार्थ आमदार राजेश पाडवी, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या शहर शाखेतर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. (BJP criticize Congress leader Rahul Gandhi on Savarkar issue)

शहरातील दत्त मंदिर, मेन रोडमार्गे स्मारक चौक व तेथून बिरसा मुंडा चौकापर्यंत यात्रा काढण्यात आली. या वेळी भाजप (BJP) आमदार राजेश पाडवी (MLA Rajesh Padvi) यांनी केवळ राजकीय स्वार्थापोटी सावरकरांना सातत्याने बदनाम करण्याचे षडयंत्र राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) माध्यमातून सुरू असल्याचे सांगितले.

प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी सांगितले, की सावरकर त्याग व बलिदानाचे प्रतीक असून, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे. गौरव यात्रेत प्रदेश सदस्य डॉ. शशिकांत वाणी, माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, माजी उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, जिल्हा सरचिटणीस नीलेश माळी आदी सहभागी झाले.

यावेळी कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या घोषणा देत व भगवे झेंडे फडकावत यात्रा काढली. आमदार पाडवी यावेळी म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर हा काही लोक राजकारणाचा विषय करीत आहेत. राजकीय षडयंत्र म्हणून त्यांना बदनाम करण्याचे काम सुरु केलेले आहे. मात्र ते त्यात कधीही यशस्वी होऊ शकणार नाहीत. कारण स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य खुप मोठे आहे. त्यांनी हिंदुत्वाला नवी ओळख निर्माण करून दिली.

भाजप किसान मोर्चाचे राजेंद्र राजपूत, तालुकाध्यक्ष प्रकाश वळवी, शहराध्यक्ष योगेश चौधरी, माजी नगरसेवक संजय माळी, गौरव वाणी, हेमलाल मगरे, जितेंद्र सूर्यवंशी, रामानंद ठाकरे, प्रदीप शेंडे, कैलास चौधरी, पंचायत समितीचे उपसभापती विजय राणा, शिरीष माळी, भरत चौधरी, जालिंदर भोई, नारायण ठाकरे, अमन जोहरी, धारसिंग वसावे, कौशल सवाई, कपिल कर्णकार, प्रकाश कर्णकार, किरण सूर्यवंशी, नीलाबेन मेहता व तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT