Maharashtra government religious sites : राज्यातील महायुती सरकारने अनधिकृत अतिक्रमणांविरोधात कारवाईचा बडगा उगरला आहे. एकाचवेळी स्थानिक प्रशासनाकडून अनधिकृत अतिक्रमणांविरोधात कारवाई अजूनही सुरू आहे. आता या कारवाईची व्यापकता वाढण्याचे संकेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.
राज्यात औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापलेला आहे. यातच अनधिकृत धार्मिक स्थळांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे संकेत मंत्री बावनकुळे यांनी दिले आहेत.
महायुती (Mahayuti) सरकारने सुरवातीलाच अनधिकृत अतिक्रमणांवर वक्र नजर टाकली. यानंतर राज्यातील हजारो अतिक्रमणांवर बुलडोझर फिरवण्यास सुरवात केली. आता, शेवगाव-पाथर्डीच्या भाजप आमदार मोनिका राजळे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील सरकारी जमीन आणि देवस्थान इनाम जमिनीवरील अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण संदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती.
यावर, सरकारी जमीन आणि देवस्थान इनाम जमिनीवर झालेली अतिक्रमणे महसूल, पोलिस (Police) आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने हटवली जातील, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्षवेधीच्या उत्तरात दिले.
महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, संबंधित तालुक्याचे तहसीलदार, पोलिस विभाग आणि स्थानिक प्राधिकरण यांची बैठक घेऊन यासंदर्भात कार्यवाही केली जाईल.
ग्रामपंचायत अन् नगरपालिका हद्दीत असलेल्या अतिक्रमणांसाठी स्थानिक प्रशासनाला जबाबदारी सोपवली जाणार आहे. महसूल विभागाच्या अखत्यारितील अतिक्रमण हटवण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांवर असेल. गृह विभागाच्या निर्णयानुसार, अनधिकृत धार्मिक स्थळांवरही कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.