BJP Minister Jaykumar Gore : अश्लील फोटो प्रकरण, मंत्री गोरेंच्या खंडणीच्या गुन्ह्यात मोठी अपडेट; उपमुख्यमंत्री शिंदेंचा 'सुभेदार' अटकेत

BJP Minister Jaykumar Gore police Satara Eknath Shinde Shiv Sena extortion case : भाजप मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे मागितलेल्या खंडणी प्रकरणात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सातारा जिल्ह्यातील उपजिल्हाप्रमुखाला पोलिसांकडून अटक केली.
Jaykumar gore
Jaykumar gore Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics update : राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे एक कोटी रुपयांच्या खंडणीच्या मागणीत, सातारा पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. या महिलेने अश्लील फोटोचे प्रकरण मिटवण्यासाठी गोरे यांच्याकडे तीन कोटी रुपये मागितले होते. त्यातील एक कोटीची रक्कम मंत्री गोरेंकडून स्वीकारताना, या महिलेला पोलिसांनी अटक केली.

आता या प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. या महिलेमागे आखणी राजकीय पदाधिकारी असल्याचे समोर येत आहे. सातारा पोलिसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील उपजिल्हाप्रमुख अनिल सुभेदार यांना अटक केली आहे. या कारवाईमुळे या प्रकरणाचे धागेदोरे खोलवर रुतलेले असल्याचे समोर येत आहे.

राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला सातारा पोलिसांनी आज शुक्रवारी सकाळी अटक केली. अश्लील फोटो पाठवल्याचे प्रकरण मिटवण्यासाठी या महिलेने गोरे यांच्याकडे तीन कोटींची खंडणी मागितली होती. यातील एक कोटी रुपयांची खंडणी घेताना संबंधित महिलेला अटक केली.

Jaykumar gore
Chhaava Movie Controversy : 'छावा' सिनेमानंतर तणाव, थोरातांचा महायुती सरकारला 'कडक' सवाल; 'दंगलींवर राज्य करणार का?'

महिलेला अटक करण्यापाठोपाठ आता, आणखी एकाला अटक केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेना (Shivsena) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अनिल सुभेदार याला दहिवडी पोलिसांनी अटक केली. खंडणी प्रकरणात संबंधित महिलेसह अनिल सुभेदार याचा सहभाग असल्याचा आरोप आहे. दहिवडी येथील न्यायालयात अनिल सुभेदार याला पोलिसांनी हजर केले आहे.

Jaykumar gore
Balasaheb Thorat : दिशा सालियान प्रकरणात ठाकरेंच्या मदतीला धावला काँग्रेसचा दिग्गज नेता, म्हणाला...

दरम्यान, महिलेला देण्यासाठी एक कोटी रुपये मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे कोठून आले, असा सवाल आमदार रोहित पवार यांनी केला आहे. खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणाच्या कारवाईबाबत शंका उपस्थित करत पोलिस प्रशासनाची पोलिसगिरी सुरू आहे का, असा सवाल केला.

खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील त्या महिलेच्या पिशवीत एक कोटी रुपये कोणी टाकले आहे का? असा सवाल करत कारवाईवर शंका उपस्थित केली आहे. या अश्लील फोटो प्रकरणावरून मंत्री गोरे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी विधिमंडळात लावून धरली होती. मात्र, हे प्रकरण 2019 मध्ये मंत्री गोरे यांची न्यायालयाने मुक्तता केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com