Maharashtra MLC news : विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे. महायुती अन् महाविकास आघाडीकडून उमेदवार निश्चितीचं काम सुरू आहे. भाजपची यादी दिल्ली जाऊन, पुन्हा मुंबईत येऊन धडकली आहे. यात कोणाची वर्णी लागली, याची आता उत्सुकता आहे.
अहिल्यानगरमधून भाजपला पाचवा आमदार निश्चित झाल्याच्या चर्चांना जोर आहे. विवेक कोल्हे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज शिर्डी इथं केलेल्या विधानामुळे कोल्हे यांच्या नाव जवळपास निश्चित असल्याचे संकेत मिळाले आहेत.
भाजप (BJP) मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आजा शिर्डी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्याबरोबर स्थानिक नेत्या म्हणून, माजी आमदार स्नेहलता कोल्हे बरोबर होत्या. मंत्री बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना, विधान परिषदेच्या निवडणुकीवर भाष्य केले. विवेक कोल्हे यांच्या आमदारकीवर सूचक भाष्य केले. यामुळे कोल्हे यांच्या आमदारकीच्या चर्चांना जोर धरला आहे.
मंत्री बावनकुळे यांनी, विधानसभा निवडणुकीच्या वेळी आम्ही, त्यांना विधान परिषद देऊ हे सांगितले होते. हा शब्द पक्षाने कुठेही मागे घेतलेला नाही, असे स्पष्ट केले. मंत्री बावनकुळे यांच्या या विधानाने अहिल्यानगरला भाजपचा पाचवा आमदार, विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांच्या रूपाने फिक्स झाल्याची चर्चा आहे.
विवेक कोल्हे यांनी विधानसभा निवडणुकीत माघार घेतली होती. तत्कालीन उपमुख्यमंत्री अन् आताचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई यशस्वी ठरली होती. विवेक कोल्हे यांनी माघार घेताच, फडणवीस यांनी कौतुक केलं होतं.
विधानसभा निवडणुकीनंतर विवेक कोल्हे यांनी संयम दाखवत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवले. असे असले तरी, मतदारसंघातील महायुतीमधील मित्रपक्षाचे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधींविरोधात राजकीय संघर्ष सुरू असतो.
विवेक कोल्हे यांनी जिल्ह्यात आगामी काळात येऊ घातलेल्या, जिल्हा बँक, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या देखील तयारीत आहेत. विधान परिषदेत संधी मिळताच, या निवडणुकांना समोरे जाताना, कोल्हे यांना अधिक बळ मिळणार आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीकडे लक्ष लागलं असून, यात कोल्हेंना भाजपकडून संधी मिळणार का? याकडे लक्ष लागलं आहे.
साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ कधी येणार, यावर मंत्री बावनकुळे यांनी, साईबाबांचे आशीर्वाद झाल्यावर सर्व मार्गी लागले. मुख्यमंत्री लवकरच यावर निर्णय घेतील, असे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.