

Rahuri by-election news : राहुरी पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला आहे. जवळपास 50.74 टक्के मतदान झालं आहे. यातच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी, अखेरच्या क्षणी गांवोगावच्या कार्यकर्त्यांना, समर्थकांना मोकळीक दिली होती.
प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यकर्त्यांनी नेमकी काय भूमिका घेतली हे स्पष्ट झालेली नाही. कार्यकर्ते अन् समर्थकांनी यावर गोपनीयता बाळगली आहे. त्यामुळे निकालीची उत्सुकता वाढली आहे.
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत काल दुपारपर्यंत अपेक्षित प्रतिसाद नव्हता. मतदारसंघात एकूण तीन लाख 33 हजार 545 मतदार (Voter) आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत 74.52 टक्के मतदान झाले होते. विशेष म्हणजे, यावेळच्या निवडणुकीत सुमारे नऊ हजार मतदार वाढले होते. तरी पण निवडणुकीचा टक्का घसरला आहे.
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी पोटनिवडणुकीत तटस्थ भूमिका घेतली होती. पण ही भूमिका घेताना, त्यांनी कार्यकर्ते आणि समर्थकांबरोबर निर्णायक बैठक घेतली होती. या बैठकीतच त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीत काय करायचं, हे स्पष्ट केलं होते. पण नेमकं काय करायचं हे अजूनही बाहेर आलेलं नाही. तनपुरे अन् कार्यकर्ते, असे दोन्ही बाजूने मौन बाळगून आहेत.
प्राजक्त तनपुरे यांनी, मतदानाच्या दिवशी अखेरच्या क्षणी कार्यकर्त्यांना मोकळीक दिली होती. तनपुरे यांच्या कार्यकर्त्यांनी राहुरीत नेमकं काय केलं, याची जोरदार चर्चा आहे. निवडणुकीच्या रिंगणातील सर्व उमेदवारांची भिस्त ही राहुरीतील मतदारांवर आहे. त्यामुळे इथं किती अन् कोणाला मतदान घडलं, हे निकालानंतरच स्पष्ट होईल. त्यामुळे निकालाची उत्सुकता वाढली आहे.
राहुरी पोटनिवडणुकीत भाजपचे अक्षय कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे गोविंद मोकाटे, वंचितचे संतोष चोळके, शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे स्थानिक नेते बंडखोर रावसाहेब खेवरे यांच्यासह सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. अपक्ष उमेदवारांनी देखील निवडणुकीच्या मैदानात जोरदार ताकद लावली आहे.
अपक्ष उमेदवार जे मत घेतील, त्याचबरोबर खेवरे अन् चोळके हे जे मतदान घेतील, त्याचा नेमका कोणाला धक्का बसेल, याची आता चर्चा रंगली आहे. यातच प्राजक्त तनपुरे यांनी स्वतः तटस्थ राहण्याची भूमिका घेतली असली, तरी मतदानाच्या दिवशी अखेरच्या क्षणी कार्यकर्त्यांना दिलेली मोकळीक, यामुळे निकालाची उत्सुकता वाढली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.