

Ashok Kharat Nashik : नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याचे राज्यभरातील अधिकाऱ्यांच्या संपर्काची चर्चा आहे. यातून काहींचे नाव देखील समोर आले आहेत.
अशोक खरात याचा विकृतपणा समोर आल्यानंतर, त्यावर वेगवेगळे कलमाखाली जवळपास 15 गुन्हे दाखल झाले आहेत. पण त्याच्या संपर्कात असलेल्या अधिकाऱ्यांच्यावर आता कारवाईचे संकेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. अशा अधिकाऱ्यांवर थेट बडतर्फची कारवाई होईल, असे संकेत मंत्री बावनकुळे यांनी दिले आहेत.
भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे कुटुंबासह शिर्डी दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना, अशोक खरात याच्या संपर्कात असलेल्या राज्यभरातील अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिले. मंत्री बावनकुळे यांच्या या संकेतामुळे राज्यातील प्रशासकीय पातळीवर खळबळ उडाली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, अशोक खरात (Ashok Kharat) याच्याबरोबर याच्या मालमत्ता, जमीन खरेदी किंवा इतर कारनाम्यांमध्ये, अनेक अधिकारी सहभागी असल्याचे समोर येत आहे. महसूल विभागातील अधिकारी देखील आहेत. यांच्यावर बडतर्फीची कारवाई होईल.
'अशोक खरात याच्या प्रकरणाची SIT चौकशी सुरू आहे. या चौकशीत भोंदू अशोक खरातशी संबधित अधिकाऱ्यांची नावे समोर येणार आहे. SIT महसुलमंत्र्यांना देखील अंतिम चौकशीचा रिपोर्ट देणार आहे. अशोक खरातची साथ देणारे महसूल विभागातील अधिकारी बडतर्फ होतील,' असे मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.
जमिन खरेदी करण्यात , जमिन लाटण्यात तसेच आर्थिक व्यवहारात ज्यांचा पूर्णत: सहभाग दिसतोय, असे अधिकारी बडतर्फ होतील. ज्या ज्या विभागाचे यात लोक आहेत, त्यांचेवर आम्ही कारवाई करू,' असेही मंत्री बावनकुळे यांनी म्हंटलं.
'एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी, छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या विधानांवर आणि शिवाजी कोण होता, या पुस्तकाच्या प्रकाशाला दिलेल्या धमकीवर प्रतिक्रिया देताना, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलताना विचार अन् अभ्यास गरजेचे आहे. छत्रपतींच्या नावातूनच ऊर्जा मिळते. त्यामुळे त्यांचा उल्लेख करताना सगळ्यांची सांभाळून केला पाहिजे,' असे मंत्री बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.