Sanjay Raut Girish Mahajan clash Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

ShivSenaUBT vs BJP : संजय राऊतांची पाठ फिरताच, मंत्री महाजनांची शिवसेना ठाकरे सेनेत 'भूंकप' घडवण्याची भाषा

BJP Minister Girish Mahajan Criticizes ShivsenaUBT Sanjay Raut Visit to Nashik : शिवसेना खासदार संजय राऊत यांचा नाशिक दौरा उरकताच, भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना ठाकरेविषयी मोठा दावा केला.

Pradeep Pendhare

Sanjay Raut Girish Mahajan clash : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांचा नाशिक दौरा उतरकताच, भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना ठाकरे सेना पक्षाविषयी मोठा बाॅम्ब फोडला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष लवकरच खाली सर्वच पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत. आता पुढील आठ दिवसांत कुणी पक्षात राहणार नाही,’’ असे सूचक इशारा मंत्री महाजन यांनी दिला. येत्‍या काळात काही पक्ष नेस्‍तनाबूत होतील, असा दावा देखील केला आहे.

खासदार संजय राऊत नाशिक (Nashik) दौऱ्यावर होते. राऊत यांनी या दौऱ्यात महायुती सरकारवर गंभीर आरोप केले. पैसा फेको और तमाशा देखो, पक्ष फोडो, असा हल्लाबोल राऊतांनी केला. या आरोपांना भाजप मंत्री महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

‘शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नेस्‍तनाबूत होण्याच्‍या मार्गावर आहे. राऊत यांच्या बोलण्यामुळे स्वतः उद्धव ठाकरे देखील वैतागले आहेत. पण आता विषय नियंत्रणाबाहेर गेला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे त्‍यांचा पक्ष संपविण्यासाठी संजय राऊत पुरेसे आहेत,’ अशी टिपणी महाजन यांनी केली. पुढील आठ दिवसात शिवसेना ठाकरे सेना पक्ष लवकरच खाली होईल, असा देखील दावा केला.

दरम्यान, संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्याचबरोबर नाशिक शहराचे शिवेसना ठाकरे सेना पक्षाचे शहरप्रमुख विलास शिंदे यांच्या मुलीच्या लग्नाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. त्यामुळे शिवसेना ठाकरे सेनाच्या प्रमुख पदाधिकारी देखील साथ सोडणार, अशी चर्चा आता रंगली आहे.

मंत्री महाजन यांनी कुंभमेळ्याच्‍या कामांमध्ये गुजरातचे कोण लोक आहेत? कामाला सुरुवात होत असताना अजब दावा केला जातो आहे, यावर भाष्य केले. नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत मात्र त्यांनी मौन बाळगले. मुख्यमंत्री यावर बोलत असताना, त्यावर मी मिळू शकत नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री महाजन यांनी दिली.

'मी कुंभमेळा मंत्री'

मी कुंभमेळा मंत्री असून, ही मोठी जबाबदारी आहे. कुंभमेळ्यासंदर्भात काम सुरू आहे, असे सांगून राजाभाऊ वाजे यांच्‍या नाराजीवर कुंभमेळा बैठकीसाठी केवळ मंत्र्यांना आमंत्रण होते. आमदार, खासदारांना आमंत्रण नव्‍हते, मुख्यमंत्र्यांकडे काही आमदारांचे काम असल्याने ते उपस्थित होते, अशी प्रतिक्रिया मंत्री महाजन यांनी दिली. कुंभमेळ्यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीच्या निमित्ताने पहिल्‍यांदाच सर्व तेरा आखाड्यांचे महंत एकत्र आल्याचेही महाजन यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT