Radhakrishna Vikhe on Balasaheb Thorat sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe on Balasaheb Thorat : थोरातांना आणखी अनेक धक्के मिळणार; मंत्री विखे म्हणाले, 'त्यांनी अपयश स्वीकारण्याची तयारी ठेवावी'

BJP Minister Radhakrishna Vikhe Congress leader Balasaheb Thorat political issues Sangamner Maharashtra : अहिल्यानगरमधील भाजप मंत्री राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेसचे संगमनेरमधील नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली आहे.

Pradeep Pendhare

Maharashtra politics : भाजप मंत्री राधाकृष्ण विखे आणि काँग्रेसचे संगमनेरमधील नेते बाळासाहेब थोरात यांच्यातील राजकीय संघर्ष तापणार आहे.

मंत्री विखे यांनी थोरातांना आणखी अनेक धक्के मिळणार आहेत. त्यांनी आता आणखी अपयश पचवण्याची, स्वीकरण्याची तयारी ठेवावी, असे म्हणत डिवचलं आहे. वसंतोत्सव प्रारंभाच्या पहिल्याच दिवशी विखे अन् थोरातांमधील राजकीय संघर्ष सुरू झाल्याने तो पुढं वणव्याचं रूप घेणार, अशीच काहीची स्थिती आहे.

मंत्री विखे यांनी होळीच्या एक दिवस अगोदर संगमनेर नगर पालिकेत आढावा बैठक घेतली. त्यावेळी तिथं छात्रभारतीचे पदाधिकारी भाजप (BJP) मंत्री नीतेश राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाविषयी केलेल्या विधानाचा निषेध नोंदवला. घोषणाबाजी करत, नीतेश राणे यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी करत निवेदन दिले.

मंत्री विखे यांच्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांनी छात्रभारतीच्या पदाधिकाऱ्यांना चांगलीच धक्काबुक्की केली. यानंतर विखे यांनी बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यावर निशाणा साधला होता. बाळासाहेब थोरातांनी देखील विखेंना जोरदार प्रत्युत्तर दिले होते.

थोरातांना आणखी धक्के मिळणार

मंत्री विखे यांनी आज लोणी इथं पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा थोरातांवर निशाणा साधला आहे. 'संगमनेरमधील आढावा बैठकीत झालेल्या गोंधळाकडे मी फार लक्ष देत नाही. तशी गरज नाही. मी सातत्याने अशा बैठका घेत असतो. त्यांनी अपयश स्विकारण्याची तयारी ठेवावी. संगमनेर तालुक्याची अधोगती झाली म्हणून लोकांनी त्यांना नाकारलं आहे', अशी मंत्री विखे यांनी थोरातांवर टीका केली. बाळासाहेब थोरातांना आणखी अनेक धक्के मिळणार आहेत, असाही सूचक इशारा मंत्री विखेंनी दिला.

शिर्डीतील अपप्रवृत्तींना रोखा

शिर्डीत भक्तांची फुल विक्रेत्यांकडून लूटमार होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. या मंत्री विखे यांनी भक्तांची लूटमार होऊ नये यासाठी सोसायटी मार्फत फुल-प्रसाद स्टॉल सुरू केले आहेत. प्रशासन कारवाई करेल. मात्र ग्रामस्थांनी देखील शिर्डीची बदनामी होणार नाही याची काळजी घ्यावी. अपप्रवृत्तींना रोखावे, असे म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT