Mallikarjun Kharge BJP voter fraud  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Mallikarjun Kharge BJP voter fraud allegation : खरगेंनी मतदार घोटाळ्यांवरून भाजपला पुन्हा डिवचलं; मंत्री विखेंनी काँग्रेसच्या वर्मावरच घाव घातला

BJP Minister Radhakrishna Vikhe Patil Congress President Mallikarjun Kharge voter fraud Maharashtra Assembly elections : विधानसभा निवडणुकीत भाजपने महाराष्ट्रात मतदार घोटाळ करून जिंकल्याचा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या आरोपावर भाजप मंत्री राधाकृष्ण विखे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

Pradeep Pendhare

Congress vs BJP Maharashtra : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रिया आणि ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केलेत. यासाठी त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा दाखला दिला. भाजप वैयक्तिक लाभांसाठी ईव्हीएमचा वापर करत असल्याचा आरोप मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.

भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आरोपांना पुन्हा जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसची आजची अवस्था झाली आहे, त्यातून सुधारणा केली नाही, तर पुढच्या निवडणुकीत पक्षाला मान्यतेसाठी झगडावं लागेल, असा वर्मी लागेल, असा टोला मंत्री विखेंनी लगावला आहे.

काँग्रेसचे (Congress) दोन दिवसीय अधिवेशन गुजरातमध्ये झाले. या अधिवेशनात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी “जगभरातील अनेक विकसित देशांनी मतदानासाठी ईव्हीएम हटवून, त्याजागी मतपत्रिकेचा स्वीकारल्याचा उल्लेख केला आहे. असे असताना, दुसऱ्या बाजूला आपण आजही ईव्हीएमवर अवलंबून आहोत. भाजप त्यांच्या वैयक्तिक लाभांसाठी अजूनही ईव्हीएम वापरत आहे आणि ईव्हीएमचाच प्रचार करत आहे, असा घणाघात केला.

मल्लिकार्जुन खरगे ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा काढून भाजपला (BJP) एकप्रकारे डिवचलं आहे. विधानसभा निवडणुकीला लाखो मतदार कसे वाढले? असा सवाल करताना भाजपने महाराष्ट्रात मतदार घोटाळा करत निवडणूक जिंकल्याचा आरोप केला. भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावर पलटवार केला आहे.

मंत्री विखे पाटील यांनी खरगे आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आज काँग्रेसची जी अवस्था झाली आहे, त्यात सुधारणा केली नाही, तर पुढच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मान्यतेसाठी झगडावं लागेल. मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा अध्यक्ष आहे. त्यांना असे वक्तव्य करणे शोभा देणारे नाही. ज्या राज्यात विजयी झाले, तेथील EVM मशीन चांगले आणि जेथे पराभव झाला तेथे EVM हॅक झाले हे म्हणणं चुकीचं आहे, असे मंत्री विखे यांनी म्हटले.

काँग्रेसची आजची जी हालत झाली आहे, बिकट अवस्था झाली आहे, त्यातून सुधारणा केली पाहिजे. नाहीतर पुढील काही निवडणुकांमध्ये काँग्रेसला मान्यतेसाठी झगडावं लागेल. राहुल गांधीना अजून बरेच काही शिकायचे असून त्यांनी कुठेतरी चांगला कोचिंग क्लास करावा. त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाची अधोगती झाली, अशी टीका मंत्री विखे यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT