
Shrirampur municipal office news : श्रीरामपूर नगरपरिषदेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात आझाद हिंद भ्रष्टाचार निर्मूलन समितीने केलेले अनोख्या आंदोलनाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे.
समितीने नगरपरिषद प्रशासनाविरोधात नोटाफेक करण्यात आली. मुख्य गेटवर आणि मुख्याधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक चलनी नोटांचे तोरण बांधले गेले. यानंतर देखील जमिनीवर नोटा फेकून जोरदार घोषणाबाजी करत भ्रष्ट कारभाराचा निषेध करण्यात आला.
श्रीरामपूर शहरातील नागरिकांकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा कर भरला जातो. या निधीचा योग्य वापर न होता, तो काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या खिशात जातो, असा गंभीर आरोप आझाद हिंद भ्रष्टाचार (Corruption) निर्मूलन समितीने केला.
समितीचे प्रमुख अमित मुथा यांनी फेरीवाला निवडणुकीत (Election) एक लाख रुपयांचा अपहार, स्टॉल वाटपातील गैरव्यवहार, दैनंदिन बाजार शुल्क वसुली ठेका अटी-शर्ती भंग करून देखील ठेकेदारास मुदतवाढ देणे, मुख्याधिकारी निवास दुरूस्तीच्या नावाखाली खोटे बिले उकळणे यांसारख्या प्रकरणांत संबंधित अधिकारी दोषी आढळले असल्याचा गंभीर आरोप केला. या सर्व प्रकरणांबाबत वेळोवेळी तक्रारी आणि पुरावे सादर करूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने आंदोलनाचा निर्णय घेण्यात आल्याचेही अमित मुथा यांनी सांगितले.
याशिवाय 2024 मधील लोकसभा निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन करून कामात कसुरी करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाने तीन वेळा पत्रव्यवहार करूनही कारवाई न झाल्यामुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्न उपस्थित राहतात. दोषींना पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी अमित मुथा यांनी केली.
या आंदोलनादरम्यान समितीने भ्रष्टाचाराचे दस्तऐवज उघडकीस आणण्यात आला. नगरपरिषदेच्या कारभाराविषयी नागरिकांमध्ये असंतोष वाढत असून, दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देखील समितीचे प्रमुख अमित मुथा यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.