Chalisgaon Bazar Samiti Election News Mangesh Chavan  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bazar Samiti Election: दूध संघानंतर बाजार समितीतही भाजप आमदार चव्हाणांचे वर्चस्व ; चाळीसगावात सत्ता खेचून आणली..

Chalisgaon Bazar Samiti Election News : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार राजीव देशमुख यांना हा धक्का मानला जात आहे.

कैलास शिंदे

Chalisgaon Bazar Samiti Election News : भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सहकार क्षेत्रात जिल्हा दूध संघात आपले वर्चस्व सिध्द केले होते, त्यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसकडून सत्ता हस्तगत करून भाजपकडे सत्ता खेचून आणली, आता बाजार समितीतही त्यांनी आपली ताकद दाखवली आहे.

चाळीसगाव बाजार समितीत भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी विरोधकांना धुळ चारली आहे. १८ पैकी १५ जागावर आघाडी मिळवून आपले वर्चस्व दाखविले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार राजीव देशमुख यांना हा धक्का मानला जात आहे.

समितीत १८ जागापैकी तब्बल पंधरा जागावर भारतीय जनता पक्ष प्रणित युतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. केवळ तीन जागावर महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे. आमदार मंगेश चव्हाण जिल्हा दूध संघाचे चेअरमन आहेत. बाजार समितीतील या यशामुळे त्यांचे सहकार क्षेत्राततही वरचष्मा असल्याचे दिसून आले आहे.

बाजार समितीसाठी अद्यापही मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत दहा जागांचा निकाल जाहीर झाला त्यातील आठ जागा भाजपला तर दोन जागा महाविकास आघाडीला मिळाली आहे. इतर जागांची मतमोजणी अद्याप सुरू असून लवकरच निकाल अपेक्षीत आहे. त्यात भाजप सात जागावर भाजप तर एका जागेवर महाविकास आघाडी आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार राजीव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे पॅनल उभे करण्यात आले होते. त्यांना केवळ तीन जागावर आघाडी असल्यामुळे त्यांना धक्का मानला जात आहे.

भुसावळ बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेचे नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना मोठा धक्का बसला आहे. या विजयामुळे भुसावळ मतदार संघात महाविकास आघाडीला मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे.

भुसावळ बाजार समितीत भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय सावकारे (Sanjay Savkare) यांनी बाजी मारली आहे. १८ पैकी तब्बल १५ जागावर त्यांनी विजय मिळविला आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस महाविकास आघाडीचे माजी आमदार संतोष चौधरी यांना केवळ तीन जागा मिळाल्या आहेत.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT