Bazar Samiti Election : बाजार समितीच्या निवडणुकीत १४ ठिकाणी आघाडीचे वर्चस्व ; सत्ताधाऱ्यांना धक्का

Market Committee Election : चार बाजार समित्या भाजप-सेना युतीच्या ताब्यात आल्या आहेत.
Market Committee Election
Market Committee Election Sarkarnama
Published on
Updated on

Market Committee Election : राज्यातील 95 बाजार समित्यांची आज (29 एप्रिल) मतमोजणी सुरु आहे. अनेक ठिकाणचे निकाल हाती येत आहेत. हाती आलेल्या निकालात महाविकास आघाडीने सरशी मारली आहे. तर सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

बाजार समितीच्या आतापर्यंतच्या निकालात 12 ठिकाणी महाविकास आघाडीची सरशी झाली आहे. तर चार बाजार समित्या भाजप-सेना युतीच्या ताब्यात आल्या आहेत. एक बाजार समिती इतरांच्या ताब्यात गेली आहे.

१७ बाजार समित्यांचे निकाल हाती आले आहे. दिग्रसमध्ये मंत्री संजय राठोडांना धक्का बसला आहे. त्याठिकाणी महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. यवतमाळ, लातूर, तिवसा, पुसद, भोर, सिन्नर, पालघर बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीने सत्ता मिळवली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी, मंगळवेढा, यवतमाळ जिल्ह्यातील महागाव या बाजार समित्या भाजप-शिंदे गटाच्या ताब्यात आल्या आहेत.

Market Committee Election
Raver APMC Election Results : रावेर बाजार समितीत 'मविआ'ची आघाडी ; आठ जागा पटकाविल्या..

विदर्भ

विदर्भातील वर्धा, सेलू व देवळी या बाजार समित्यांवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. या ठिकाणी भाजपला पराभव स्वीकारावा लागला आहे.

सेलू बाजार समितीच्या निवडणुकीच १८ पैकी तब्बल १५ जागांवर आघाडीचे उमेदवारांनी विजय संपादन केल आहे. या निवडणुकीत सुरेश देशमुख, काँग्रेसचे शेखर शेंडे व शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देवतारे यांच्या तिघाडीच्या शक्तीने मिळून महाविकास आघाडीचा विजय खेचून आणला आहे.

Market Committee Election
Palghar APMC Election: पालघरमध्ये आघाडीनं झेंडा रोवला ; शिंदे गटाचा सुपडा साफ

तिवसा

तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या सर्व 18 जागांचे निकाल हाती आले असून 18 पैकी 18 जागांवर आमदार यशोमती ठाकूर गटाचा विजय झाला आहे, यामुळे तिवसा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी आणि प्रहारचा धुव्वा उडाला आहे. या विजयानंतर तिवस्यामध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटाने मोठ्या प्रमाणावर जल्लोष केला. तिवसा बाजार समितीत काँग्रेस आणि ठाकरे शिवसेना एका बाजूला तर राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट, बच्चू कडू यांची प्रहार यांनी निवडणूक लढवली होती.

पालघर

पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा झेंडा रोवला गेला. 17 पैकी 17 जागा जिंकत महाविकास आघाडीने पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीवर वर्चस्व प्राप्त केले आहे. पालघर बाजार समितीवर शिवसेना शिंदे गटाचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही.काल (शुक्रवारी) झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत १५ जागा महाविकास आघाडीच्या बिनविरोध निवडून आल्या होत्या; तर व्यापारी गटाच्या दोन जागांसाठी चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

Market Committee Election
Market Committee Election : आमदार फुंडकर यांना मोठा धक्का, बुलडाण्यात आघाडीचा झेंडा

लातूर

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या कृषी विकास पॅनलचे सर्व १८ उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. तर विरोधी भाजपच्या पॅनलचे सर्व १८ उमेदवार पराभूत झाले आहेत. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी लातूरचे देशमुख बंधू आणि भाजपच्या संभाजी पाटील निलंगकेर यांच्यास जिल्ह्यातील नेत्यांनी शक्तीपणाला लावली होती.

रावेर

रावेर बाजार समितीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. प्रारंभीच्या निकालात महाविकास आघाडी आठ तर भाजप शिंदे गट केवळ एका जागेवर विजयी झाले. रावेर बाजार समितीत एकूण अठरा जागा आहेत. त्यापैकी ९ जांगाचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यात महाविकास आघाडीने आठ जागा पटकाविल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com