BJP MLA Monica Rajale Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Monica Rajale : ''सतत पाठपुरावा करूनही 'तेव्हा' विकासकामांना निधी मिळत नव्हता''; आमदार राजळेंचा आरोप!

Maha Vikas Aghadi News : ''कामांमध्ये निकृष्टपणा आढळल्यास किंवा हलगर्जीपणा झाल्यास...'' असंही म्हणाले आहेत.

Pradeep Pendhare

Pathardi-Shevgaon News : पाथर्डी-शेवगाव मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांनी तत्कालीन महाविकास आघाडीवर सरकारवर निधीवरून गंभीर आरोप केला आहे.

"मतदारसंघाच्या विकासासाठी सतत पाठपुरावा करूनही महाविकास आघाडी सरकारकडून कधीही निधी मिळत नव्हता. मात्र, आता सत्तांतरानंतर विकासकामांसाठी मोठा निधी आणि वेग आला आहे. या कामांमध्ये निकृष्टपणा आढळल्यास किंवा हलगर्जीपणा झाल्यास अधिकाऱ्यांना जबाबदार धरू," असा इशारा आमदार मोनिका राजळे (Monica Rajale) यांनी दिला.

आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते मतदारसंघात शनिवारी विविध विकासकामांचे भूमिपूजन झाले. त्यावेळी त्या बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल राजळे, माजी उपसभापती विष्णुपंत अकोलकर, भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, उपाध्यक्ष संजय कीर्तने, सुनील ओव्हळ, नारायण पालवे उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार राजळे म्हणाल्या, "विधानसभा निवडणुकीनंतर अडीच वर्षे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. मतदारसंघाच्या विकासकामांसाठी निधी मिळत नव्हता. मात्र, दीड वर्षापूर्वी राज्यात सत्तांतर झाले अन् विकासकामांना मोठा निधी मिळू लागला.

तसेच, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील भाजप महायुतीचे सरकारमुळे विकासकामांसाठी मोठा निधी मिळत आहे," असंही राजळे म्हणाल्या.

यंदा दुष्काळी परिस्थिती आहे. पाथर्डी -शेवगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला, त्याला यश आले. कोरडगाव महसूल मंडळाचादेखील दुष्काळी पुरवणी यादीत समावेश होईल. तसे पालकमंत्री राधाकृष्ण विखे(Radhakrishna Vikhe) यांनी आश्वासन दिले आहे. तसेच अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरू केल्याचे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT