Vijay Shivtare Vs  Sanjay Raut
Vijay Shivtare Vs Sanjay RautSarkarnama

Vijay Shivtare : ''संजय राऊत यांनी आपली लायकी ओळखावी आणि...'' ; विजय शिवतारेंचा घणाघात!

Shivtare Vs Sanjay Raut : मराठा, ओबीसी आरक्षणाबाबतही दिली आहे प्रतिक्रिया, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले?
Published on

Purandar News : शिवसेना (शिंदे गट) नेते विजय शिवतारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे. याशिवाय सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या परिस्थितीवरही प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊतांवर घणाघात करताना विजय शिवतारे म्हणाले, ''हे चुकीचं आहे राजकारणातील पातळी जर खालच्या थरावर कोणी आणली असेल, तर ती संजय राऊत यांनी आणली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपली लायकी ओळखावी आणि मग मुख्यमंत्री यांच्यावर टीका करावी. सर्वसामान्य माणूस जर आपल्या कर्तृत्ववाने मुख्यमंत्री बनला असेल, तर त्यांच्या विरोधात बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकणे होय.''

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vijay Shivtare Vs  Sanjay Raut
NCP Maval : अखेर पाच महिन्यांनंतर राष्ट्रवादीला मिळाला 'या' तालुक्याला अध्यक्ष...!

तसेच, ''संजय राऊत वेडा माणूस आहे. तो काहीही बडबड करतो, त्यामुळे त्याला जास्त महत्त्व देता कामा नये. संजय राऊतसारख्या एका माणसाने एवढा मोठा पक्ष कसा संपवला याची इतिहासात नोंद होईल. गावाकडच्या महिलादेखील संजय राऊतांना शिव्या घालत आहेत. एकीकडे खायचं आणि दुसरीकडे काम करायचं हे कोण करतं हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे,'' असंही शिवतारेंनी म्हटलं आहे.

याशिवाय ''कमीत कमी 45 खासदार निवडून आणून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)आणि अजित पवार हे त्रिदेव आहेत. तिघांच्या चर्चेतून कोणकोणती जागा लढवतील हे ठरवले जाईल. आम्ही महायुतीत आहोत, जिथे ज्यांची ताकद असेल तिथे तो पक्ष जागा लढवले,'' अशी माहितीही दिली.

Vijay Shivtare Vs  Sanjay Raut
Shrirang Barne In Maval : मावळात तिढा ! बारणेंच्या अडून सामंतांचे थेट अजितदादा अन् फडणवीसांना आव्हान

...या सगळ्या गोष्टी बिहारमध्ये चालायच्या -

आरक्षणावरून ओबीसी आणि मराठा समाजात निर्माण झालेल्या परिस्थितीवर बोलताना शिवतारे यांनी सांगितले की, ''हे दुर्दैव आहे, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात आजपर्यंत कधीच जाती-जातींमध्ये वाद निर्माण झाले नव्हते. या सगळ्या गोष्टी बिहारमध्ये चालायच्या. राज्याला आणि देशाला धोका निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पण सगळ्यांनी समतोल राखला पाहिजे.''

याचबरोबर ''एका नेत्याने आरे महटलं की दुसऱ्याने कारे नाही म्हटलं पाहिजे. दोघांनी संयम ठेवला पाहिजे. दोघांनी चर्चेतून मार्ग काढावा. मुख्यमंत्री हे कर्तृत्ववान आहेत, ते नक्कीच टिकणारे आरक्षण देतील. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आरक्षण महाविकास आघाडी सरकारला उच्च न्यायालयात टिकवता आलं नाही. मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते अपयशी ठरले. मराठा आरक्षणाचा मारेकरी कोण असेल तर ते महाविकास आघाडी सरकार आहे,'' असा आरोपही केला.

तर ''अडचणीचा काळ आहे, यामुळे दोन्ही बाजूंच्या वतीने संयम ठेवला पाहिजे. दुर्दैवाने आजची परिस्थिती फार वेगळी आहे. त्यामुळे कोणीही संयम सुटू देऊ नये. दोघांनी महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घ्यावा. मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. मात्र, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता ते दिल गेलं पाहिजे. कोणी कुणाला आव्हाने न देता योग्य तोडगा काढावा,'' असे आवाहनही केले.

(Edited by- Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com