Nitesh Rane Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nitesh Rane : प्रशासनाने लाड बंद करावेत, आमदार नीतेश राणेंनी दिलाय इशारा

Hindu Janakrosh Morcha Started Under the Leadership of Nitesh Rane : धार्मिक स्थळांभोवती केलेल्या अतिक्रमणांविरोधात भाजप आमदार नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कर्जतमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.

Pradeep Pendhare

Ahmednagar News : भाजप आमदार नीतेश राणे यांनी अहमदनगरच्या कर्जत तालुक्यात काढण्यात आलेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चात लव आणि लॅन्ड जिहादवर 'प्रहार' केला. महाराष्ट्रात लव आणि लॅन्ड जिहाद माध्यमातून हिंदूंची संख्या कमी करण्याचे षडयंत्र सुरू आहे.

देशात शरिया कायदा लागू करण्याचा काहींचा प्रयत्न आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान देखील यांना मान्य नाही. स्वतंत्र वक्फ बोर्ड पाहिजे. वेगळे बोर्ड पाहिजे. प्रशासनाने यांचे लाड बंद करावेत, असा घाणाघात आमदार राणे यांनी केला.

कर्जतमधील धार्मिक स्थळांभोवती झालेल्या अतिक्रमणाविरोधात सकल हिंदू (Hindu) सजामातर्फे हिंदू जनआक्रेश मोर्चा काढण्यात आला होता. संत श्री सद्गुरू गोदड महाराज मंदिरात दर्शन घेतल्यानतर हा मोर्चा बाजारतळावर येताच सभेत रूपांतरीत झाला. आमदार नीतेश राणे यांनी भाषणाच्या सुरवातीपासून 'कडक' भाषण केले.

"देशात पहिले हिंदूंचे हित पाहिले जाईल. धार्मिक स्थळांभोवती अतिक्रमण खपवून घेणार नाही. प्रशासनाने यांचे लाड बंद करावेत. कायदा-सुव्यवस्था आम्हाला शिकवू नये. प्रशासनाकडून जमत नसेल, तर यांचा कार्यक्रम करा. तुम्हाला काहीही होणार नाही, याची शाश्वती आपण देतो", अशी चिथावणी आमदार राणे यांनी मोर्चातून दिली.

कारसेवा पुन्हा करू

"संत सदगुरु गोदड महाराज ज्या ठिकाणी बसून कीर्तन करीत होते. त्या ठिकाणी अतिक्रमण करायचे. आणि आपण ते बघत बसायचे का? सिद्धटेक येथे अतिक्रमण होत आहे. आता हे खपवून घेणार नाही. प्रशासनाने अनधिकृत अतिक्रमणे काढावीत.

न काढल्यास परत-परत मोर्चा काढण्यास मी देखील मोकळा नाही. हा शेवटचा मोर्चा! आयोध्येत जशी कारसेवा करण्यात आली. तशीच कारसेवा पुन्हा करू", असा इशारा भाजप (BJP) आमदार नीतेश राणेंनी प्रशासनाला दिला.

सर्व धर्म समभावाची पिपाणी...

"आम्हाला ही आमच्या धर्माने शस्र चालवायची परवानगी दिली आहे. नवरात्र किंवा महाआरती 10 वाजता बंद करता. आणि यांच्या मिरवणुका पहाटपर्यंत चालू ठेवता. हा कुठला न्याय आणला? सर्व धर्म समभावाची पिपाणी आम्हीच वाजवायची का? असे म्हणत हिंदू धर्माचे रक्षण आपणच करायला शिकले पाहिजे", असे आमदार राणे यांनी म्हटले.

बहिणीला चाकू देण्याचा अजब सल्ला...

हर्षदा ठाकूर यांनी हिंदू समाजातील मुली व महिलांनी मुस्लिम व्यक्ती फसवत असल्याचे सांगून जागरूक राहिले पाहिजे. यंदा सर्व भावांनी राखी पौर्णिमेला आपल्या बहिणीला एक छोटा चाकू भेट द्या, असे आवाहन केले. बांगलादेशात हिंदू महिलांवर अत्याचार केले जात आहेत. त्यामुळे आपल्याला एकत्र येत लढण्यासाठी सज्ज राहावे लागले, असे हर्षदा ठाकूर यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT