ram shinde sujay vikhe sakarnama
उत्तर महाराष्ट्र

MLA Ram Shinde News : 'नगर दक्षिणमधून विजय कोणाचा होणार? मताधिक्य घटणार'; आमदार शिंदे स्पष्ट बोलले...

Nagar South Lok Sabha 2024 Result : 2019 च्या निवडणुकीत खासदार डॉ. सुजय विखे यांना सुमारे पावणे तीन लाखाचे मताधिक्य होते. यावेळी ते एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होतील. कारण 2014 पूर्वीच्या काँग्रेस सरकारच्या काळात काय झाले होते, हे नव्या पिढीला माहीत नाही.

Pradeep Pendhare

Nagar South Constituency : "लोकसभा निवडणुकीत अनेक अफवा पसरवल्या गेल्या होत्या, तथाकथित सर्व्हेही झाले होती. परंतु नगर दक्षिणेतून विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे निश्चित विजय होतील. मात्र, त्यांचे मागच्या निवडणुकीतील मताधिक्य घटून एक लाखाच्या फरकाने ते विजय होतील", असा दावा भाजप आमदार प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी केला.

जामखेड तालुक्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती महोत्सव 31 मे रोजी होणार असून त्याची माहिती आमदार प्रा. शिंदे यांनी माध्यमांना दिली. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी भाष्य केले. माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, अरुण मुंडे, निशांत दातीर उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha 2024) निकालावर प्रा. शिंदे यांनी भाष्य केले. "निवडणूक काळात अनेक अफवा पसरवल्या गेल्या होत्या. अनेक तथाकथित सर्व्हे समोर आणले गेले. आचारसंहितेच्या काळात सर्व्हे रिपोर्ट जाहीर करायचे नसतात, तरीही ते जाहीर होत होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची नगरला झालेली सभा, त्या सभेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद, याशिवाय सर्वसामान्य शेतकरी, दुर्लक्षित-उपेक्षित समाज घटकाला मागील दहा वर्षात मिळालेला न्याय आणि झालेले सहकार्य याची जाणीव मतदारांनी प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचे ठरवले असल्याचे सभा व प्रचारातून जाणवले". त्यामुळे नगर दक्षिणेतून (Nagar South Constituency ) विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे निश्चित विजयी होणार आहेत व येत्या चार जूनला हाच निकाल लागेल, असा दावाही शिंदे यांनी केला.

खासदार विखेंचे मताधिक्य घटेल

आमदार प्रा. राम शिंदे म्हणाले, 2019 च्या निवडणुकीत खासदार डॉ. विखे यांना सुमारे पावणे तीन लाखाचे मताधिक्य होते. मात्र, यावेळी ते एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होतील. कारण 2014 पूर्वीच्या काँग्रेस सरकारच्या काळात काय झाले होते, हे नव्या पिढीला माहीत नाही. त्यामुळे मागच्या दहा वर्षात मोदी सरकारच्या काळाचा ते विचार करतात. यामुळे काही अंशी अँटि इनकंबसीचा फटका मताधिक्यावर होईल, पण निकालात अजिबात फरक पडणार नाही, असा दावाही आमदार प्रा. शिंदे यांनी केला. BJP MLA Ram Shinde has said that the vote margin of candidate MP Sujay Vikhe will decrease

शिक्षक मतदारसंघात महायुतीचा उमेदवार

विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत नगर जिल्ह्यात महायुतीतून युवा नेते विवेक कोल्हे आणि राजेंद्र विखे, असे दोघे इच्छुक आहेत. महायुतीचे वरिष्ठ नेते उमेदवारीबाबत निर्णय घेतील. मात्र, या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार असेल, असेही प्रा. शिंदे यांनी आवर्जून स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT