Vikhe V/S Lanke : सट्टेबाजारात विखे-लंके यांच्यात चुरस, एवढा फुटला भाव; पैजांची रक्कम पोहोचली लाखापर्यंत...

Nagar South Constituency : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता आहे. सट्टेबाजारात विखे आणि लंके यांना सर्वाधिक पसंती दिसते. विजय आणि पराभवासाठी सट्टेबाजार वेगवेगळे भाव आहेत.
Sujay Vikhe, Nilesh Lanke
Sujay Vikhe, Nilesh Lankesakarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 Result : लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जूनला आहे. राज्यातील लक्षवेधी निवडणुकांमध्ये नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या (Nagar South Constituency) निवडणुकीचा समावेश होतो. या मतदारसंघातील निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. नगर दक्षिणच्या निकालावर सट्टाबाजार देखील तेजीत आला आहे. याशिवाय पैजा देखील लागल्या आहेत.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुती भाजपचे (BJP) उमेदवार खासदार सुजय विखे आणि महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके यांच्यात थेट लढत आहे. निवडणुकीच्या रिंगणात 25 उमेदवार आहेत. तरी देखील सट्टेबाजारात विखे आणि लंके यांना सर्वाधिक पसंती दिसते. विजयाची शक्यता असलेल्या उमेदवारासाठी एकास एक म्हणजेच, 100 रुपयांना 200 रुपये भाव आहे. पराभवाची शक्यता असलेल्या उमेदवारावर पैसे लावल्यास 100 रुपयांना 300 रुपयांचा भाव, म्हणजे एकास तीन असल्याचे सांगितले जाते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sujay Vikhe, Nilesh Lanke
Hiraman Khoskar: शांत बसा...; काँग्रेस आमदाराचा मुख्यमंत्र्यांबाबत मोठा गौप्यस्फोट; पण, मी आघाडीचा धर्म पाळला...

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात विखे आणि लंके (Vikhe V/S Lanke) यांच्यात चुरशीची लढत झाली. मतदानाच्या दिवशी संपूर्ण मतदारसंघात तणावपूर्व वातावरण होते. त्यामुळे निकालाची उत्सुकता आहे. सट्टेबाजारात दोन्ही उमेदवारांना पसंती मिळते आहे. त्यामुळे निकालाबाबत देखील सट्टेबाजारात संभ्रम दिसतो. या निकालावर सट्टेबाजारात कोट्यवधीचा उलाढाल होईल, असे दिसते. Betting market booms in Nagar South Lok Sabha constituency results

पैजांची रक्कम त्रैयस्थ व्यक्तींकडे...

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Elections) कोण जिंकणार याचे अंदाज बांधले जात आहे. सट्टेबाजारानंतर निकालाबाबत पैजा देखील लागल्या आहेत. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून विजयाचा दावा केला जात आहे. काही जणांमध्ये पैजा लागल्या आहेत. या पैजांची रक्कम लाख रुपयापर्यंत गेली आहे. काहींनी पैजा लावून पैजेची रक्कम त्रैयस्थ व्यक्तीकडे ठेवल्याचे सांगितले जाते. मतमोजणीसाठी मतपेट्या ईव्हीएम मशीन गोदामाभोवती जिल्हा प्रशासनाचा कडक बंदोबस्त आहे. सीसीटीव्हीच्या निगराणीखाली गोदाम आहे. यासाठी स्ट्राँग रूम उभारण्यात आली आहे. नीलेश लंके यांचे पदाधिकारी या स्ट्राँग रूममध्ये मतपेट्या सील झाल्यापासून तळ ठोकून आहेत. यावरून निकालाची संवेदनशीलता किती मोठी आहे, हे लक्षात येते.

Sujay Vikhe, Nilesh Lanke
Nashik Teacher Constituency Election : शिक्षक एकवटले, 'टीडीएफ'चे पदाधिकारी अन् त्यांचा उमेदवारही अनधिकृत...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com