NCP Candle March against Brijbhushan Singh  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NCP Candle March against Brijbhushan Singh : ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात आता राष्ट्रवादीच्या महिला आक्रमक..

Nashik News : नाशिक जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेस तर्फे कॅन्डल मार्च होणार आहे.

सरकारनामा ब्युरो

Nashik News : लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले भाजपचे खासदार, भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल होऊनही अद्याप कारवाई न झाल्याने दिल्लीत

जंतर-मंतर मैदानावर कुस्तीवीरांचे आंदोलन चालू आहे. या कुस्तीपटूंना पाठिंबा देण्यासाठी नाशिक राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली कॅन्डल मार्च आयोजीत करण्यात आला.

काल (मंगळवारी) बलकवडे व्यायामशाळा भगूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधीकारी व व्यायामशाळेतील कुस्तीपटू यांनी मेणबत्ती पेटवून भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांचा निषेध करत कुस्तीपटू महिलांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली.

सत्तेचा गैरवापर भाजप खासदार करुन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. अशी वाईट वृत्तीच्या व्यक्तीवर कडक कारवाई होण्याची मागणी घेऊन भगूर शहरात मेणबत्ती पेटवुन निदर्शने करण्यात आली.

महिला कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ त्यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी नाशिक जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेस तर्फे कॅन्डल मार्च होणार असल्याचे प्रेरणा बलकवडे यांनी सांगितले.

भारतीय कुस्तीगार परिषदेचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात गेल्या अनेक दिवसांपासून कुस्तीपटूंचं आंदोलन सुरु आहे. आंदोलन करणाऱ्या या कुस्तीपटू आणि केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्यात 7 जून रोजी बैठक पार पडली.

या बैठकीला कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक उपस्थित होते. कुस्तीपटूंनी या बैठकीत पाच मागण्या केल्या. यामध्ये बिज्रभूषण सिंह यांना अटकेच्या मागणीवर जोर दिला होता. तसेच आश्वासनानंतर कुस्तीपटूंनी 15 जूनपर्यंत आंदोलन स्थगित केले होते.

या वेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, सायरा शेख, विशाल बलकवडे, मयुर चव्हाण, आक्षय येदे, मेहरुनिसा खान, लक्ष्मी झांजरे, भारती भुसाळ,सोनाली जाधव,मनिषा पाटील,सुवर्णा भामरे, संस्कृती सिरसाट, विरा बलकवडे, दिपाली पाटील, रोहिणी मुकणे, रिहाना खान, राधा जाधव, राहूल कापसे, अजंठा काळे, विकास मोरे, दिपक जाधव, समीर कामाले, आतुल मेदडे,सचिन गुडेकर, किरण पाटील, हेमंत वाघ तसेच महिला पदाधीकारी व कुस्तीपटू उपस्थित होते.

ब्रिजभूषण सिंह यांच्यावरील या आरोपांनंतर एकच खळबळ उडाली असून काँग्रेससह अन्य राजकीय पक्षांनीदेखील कुस्तीपटूंना पाठिंबा देत ब्रिजभूषण सिंह यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली. याच कारणामुळे ब्रिजभूषण सिंह आगामी काळात लोकसभेची निवडणूक लढवणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रश्नाचे आता ब्रिजभूषण सिंह यांनी थेट उत्तर दिले आहे. मी २०२४ सालची लोकसभा निवडणूक लढवणार आहे, असे ते म्हणाले आहेत.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT