Rohit Pawar: रोहित पवार झाले आता खऱ्या अर्थाने कर्जतकर; गृहप्रवेशही झाला...

Karjat-Jamkhed : रोहित पवार यांनी कर्जत येथे नवे निवासस्थान बांधले असून या निवासस्थानाचे नामकरण 'दिनकर' असे केले आहे.
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama

राजेंद्र त्रिमुखे :

Ahmednagar : कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कर्जतमध्ये बांधलेल्या घराच्या आणि कार्यालयाच्या वास्तुपुजेसाठी राजकीय विरोधक असलेले महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, भाजप खासदार सुजय विखे आणि भाजप आमदार राम शिंदे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर आमंत्रण दिले होते.

मात्र, या तीनही राजकीय विरोधकांनी वास्तुपुजेच्यानिमित्ताने ठेवलेल्या तिर्थप्रासादास येणे टाळले. सायंकाळपर्यंत यापैकी कोणीही कर्जतकर झालेल्या रोहित पवारांच्या कार्यक्रमाला आलेले नव्हते.

याबाबत आमदार पवार यांना पत्रकारांनी विचारले असता, "पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे, आमदार प्रा.राम शिंदे हे राजकीय विरोधक असले तरी त्यांना वास्तूची पुजा व नामकरण सोहळ्याला येण्यासाठी विनंती केली.

संस्कृती पाळत असताना आपण कोठे कमी पडू नये, या हेतूने निमंत्रण दिले. चांगल्या गोष्टीसाठी भेदभाव करू नये, अशी विनंती मी त्यांना केली. ते येतात न येतात हा त्यांचा व्यक्तीगत विषय आहे", असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.

Rohit Pawar
Eknath Shinde News: मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात सांगितली राज्य सरकारने केलेल्या कामांंची यादी; म्हणाले...

रोहित पवार यांनी कर्जत येथे नवे निवासस्थान बांधले. या निवासस्थानाचे नामकरण 'दिनकर' असे केले. या सोहळ्याचे निमंत्रण पवार यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे, सुजय विखे व राम शिंदे यांना दिले होते. तसेच येण्यासाठी विनंती केली. तसेच याबाबत सोशल मीडियावर तशी पोस्टही केली होती.

"घर किंवा वास्तू आपण बांधतो तो आपला व्यक्तिगत विषय असतो. आपल्या परीसरात असणारे नागरीक, नातेसंबंध, विविध क्षेत्रात काम करणारे लोक, प्रतिष्ठित व राजकारणी लोक अशा सर्वामध्ये राजकारण मध्ये न आणता त्या सर्वांना चांगल्या विचारांनी येण्यासाठी आपण विनंती करतो.

त्यादृष्टीने कर्जत-जामखेडमधील नागरिकांनी मला आमदार केले. तसेच माझे कार्यकर्ते व राजकीय विरोधक या सर्वांना निमंत्रण दिले आहे. पण राजकीय विरोधकांना विनंती केली, ते येतील ना येतील तो त्यांचा विषय आहे", असं आमदार पवार म्हणाले.

Rohit Pawar
Five ministers but Gharkul scheme stalled? : केंद्र आणि राज्यातले मिळून पाच मंत्री, तरी घरकुल योजना रखडली ?

दरम्यान, रोहित पवारांवर वेळोवेळी त्यांचे राजकीय विरोधक असलेले आमदार राम शिंदे यांनी रोहित पवार'बाहेर'चे असल्याची टीका-टिपण्णी विविध मुद्यांवरून केली होती. तसेच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनीही बारामतीचे पार्सल परत पाठवून द्या, असे वक्तव्य जाहीर सभेतून केले होते. मात्र, आता रोहित पवार हे खऱ्या अर्थाने कर्जतकर झाले आहेत.

(Edited By- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com