Raksha Khadse, Eknath Khadse
Raksha Khadse, Eknath Khadse sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

एकनाथ खडसेंसह त्यांच्या लेकी विरोधात; खासदार सुनबाई मैदानात

कैलास शिंदे

जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीच्या अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी झाली आहे. भाजप खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी दोन गटात अर्ज दाखल केला आहे. रक्षा खडसे यांच्या पुढील राजकारणाची व केंद्रीय मंत्रिपदाची ही लिटमस टेस्ट असल्याची चर्चा भाजप (BJP) कार्यकर्त्यात सुरू आहे. (BJP MP Raksha Khadse filed an application for Jalgaon District Bank)

जळगाव जिल्हा बँक निवडणुकित काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व पक्षीय पॅनल मधून लढण्यास नकार दिल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भजपने स्वतंत्र निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. खासदार रक्षा खडसे या भाजप पॅनल मधून लढण्यास तयार आहेत. एकनाथ खडसे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल असून त्यांच्या कन्या रोहिणी खडसे व ते स्वतः या पॅनल मधून निवडणुक लढत आहेत. त्यामुळे खासदार रक्षा खडसे व एकनाथ खडसे हे पॅनलच्या माध्यमातून आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

खासदार रक्षा खडसे या प्रथमच जिल्हा बँक निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. त्यांनी आज महिला राखीव व इतर मागासवर्ग गटातून अर्ज दाखल केला आहे. एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर रक्षा खडसे व एकनाथ खडसे यांचा आमने सामने आले नाहीत. मात्र, आता ते पॅनलच्या माध्यमातून आमने सामने येण्याची शक्यता आहे. भाजप कार्यकर्ते या बाबत म्हणतात, रक्षा खडसे यांच्या पुढील राजकारणाची ही लिटमस टेस्ट आहे. यात जर त्यांना यश मिळाले तर आगामी काळात त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळू शकते, तसेच जिल्ह्याचे भाजपचे नेतृत्व त्यांच्याकडे येईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT