आदित्य शिरोडकर अडचणीत; गुन्हा दाखल

फिर्यादीने तब्बल 1 कोटी 97 लाख 15 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे.
Aditya Shirodkar
Aditya Shirodkarsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेना (ShivSena) नेते आदित्य शिरोडकर (Aditya Shirodkar) यांच्या गुन्हा दाखल झाला आहे. पैसे घेऊन फ्लॅटचा ताबा न देता फसवणूक केल्याप्रकरणी मेसर्स मातोश्री प्रॉपर्टीज च्या भागीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. आर ए के किडवाई मार्ग पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा करण्यात आला आहे. (Filed a case against Aditya Shirodkar)

Aditya Shirodkar
भाजपच्या सत्तेला सुरूंग? उत्तराखंडमध्ये सहा आमदार काँग्रेसच्या वाटेवर

मेसर्स मातोश्री प्रॉपर्टीजचे राजन गणेश शिरोडकर, आदित्य राजन शिरोडकर, आशुतोष अभ्यंकर, विजय येवलेकर, सुरेश गुप्ता आणि प्रफुल मेहता यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परेल परिसरात असणाऱ्या मातोश्री प्राईड इमारतीत पैसे घेऊनही फ्लॅटचा ताबा न दिल्या प्रकरणी तक्रार देण्यात आली होती.

Aditya Shirodkar
कार, बाईकपेक्षा आता विमान चालवणं झालं स्वस्त!

फिर्यादीने तब्बल 1 कोटी 97 लाख 15 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे. वारंवार मागणी करूनही फ्लॅटची ओसी व पजेशन दिले नाही, अशी तक्रार यापूर्वी करण्यात आली होती. त्यात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2017 पासून वारंवार पैसे घेऊन फसवणूक केल्याचा फिर्यादी यांचा आरोप आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com