Dr. Bharati Pawar news : दिंडोरी मतदारसंघात भाजपने केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना उमेदवारी दिली आहे. डॉक्टर पवार गेले काही दिवसांपासून कांदा उत्पादकांच्या नाराजीचा सामना करीत आहेत. आता त्यांच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
विद्यमान खासदार डॉ. भारती पवार यांनीही गेल्या पाच वर्षांत आपल्या कार्यकर्त्यांना विचारात घेतलेले नाही. भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे आपली नाराजी त्यांनी उघडपणे व्यक्त केली आहे. दिंडोरी मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या दबावामुळे आपल्यापुढे उमेदवारीचा पेच निर्माण झाला आहे.
अनेक पदाधिकाऱ्यांनी यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी करून सामान्य कार्यकर्त्यांच्या नाराजीची भावना व्यक्त करावी असे सांगितले. त्यामुळे येत्या निवडणुकीत आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत. सामान्यतः तीन मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करावा, असे आपल्या नजीकच्या कार्यकर्त्यांचे मत आहे. त्यामुळे मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात कांदा उत्पादक शेतकरी आणि द्राक्ष उत्पादक नाराज आहेत. त्यांचा थेट केंद्र सरकारवर रोष आहे. त्याचा फटका भारतीय जनता पक्षाला बसण्याची शक्यता आहे. उमेदवार डॉ. भारती पवार यांना प्रचारातदेखील त्याचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत भारतीय जनता पक्षाचे काही कार्यकर्ते माजी खासदार चव्हाण यांच्याबरोबर गेल्यास डॉ. पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यामुळे भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी यावर तोडगा काढण्यासाठी हालचाली सुरू केले आहेत. दिंडोरी मतदारसंघात भाजपच्या डॉ. पवार यांचा सामना महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भास्करराव भगरे यांच्याशी आहे. महाविकास आघाडीशी संबंधित माकपचे माजी आमदार जे. पी. गावित हेदेखील आघाडीच्या धोरणावर नाराज आहेत.
त्यात आता माजी खासदार चव्हाण यांची भर पडली आहे. वंचित बहुजन आघाडीने येथून मालती थाविल यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे एकंदरच दोन्ही प्रमुख उमेदवारांपुढे बंडखोरीचे मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे उमेदवार सध्या अस्वस्थ आहेत.
Edited By : Umesh Bambare
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.