Prasad Lad Audio Clip Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manoj Jarange Patil Audio Clip : उद्धव ठाकरेंच्या काळात 100 कोटी जमा केले होते, त्याचपद्धतीने 500 कोटी..; भाजपच्या प्रसाद लाड यांना वेगळाच संशय

BJP MLA Prasad Lad demands an SIT probe alleged ₹500 crore audio clip raised Manoj Jarange Patil and targets Sanjay Raut : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवरून भाजप आमदार प्रसाद लाड यांचा संजय राऊतांवर निशाणा; SIT चौकशीची मागणी करणार

Pradeep Pendhare

Prasad Lad on Alleged 500 crore audio clip : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या 500 कोटी रुपयांच्या ऑडिओ क्लिपच्या दणक्यातून सत्ताधारी महायुतीमधील भाजप अन् मित्रपक्ष एकनाथ शिंदे शिवसेना सावरायला तयार नाही.

भाजपने या प्रकरणात थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाला ओढायला सुरूवात केली आहे. यातून खासदार संजय राऊत यांच्यावर भाजपकडून निशाणा साधला जात आहे. आता तर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिर्डीतून वेगळाच संशय व्यक्त केला आहे. ज्यापद्धतीने उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात, 100 कोटी रुपये गोळा करण्याचा प्रकार झाला, त्याचपद्धतीने 500 कोटी रुपये गोळा करायचे होते काय, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली.

भाजप (BJP) आमदार प्रसाद लाड यांनी कुटुंबासमवेत, शिर्डी येथील साईदरबारी हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना, जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या ऑडिओ क्लिपवर भाष्य करताना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षावर थेट निशाणा साधला. आमदार लाड यांनी संजय राऊत यांचे नाव घेत, गंभीर आरोप केले.

प्रसाद लाड म्हणाले, "पूर्णतः फेक नेरीटिव्ह आहे. या सर्वांमागे संजय राऊत (Sanjay Raut) स्क्रिप्ट मास्टर असून, रोज सकाळी कुठली ना कुठली क्लिप लिहितो. या 500 कोटी रुपयांची सामनाच्या प्रेसमध्ये स्क्रिप्ट लिहिली गेली. याची चौकशी व्हावी आणि एसआयटीने संजय राऊत यांना बोलावून घ्यावे, अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण लिहिणार आहे." तसेच संजय राऊत यांची चौकशी करून अटक करण्याची मागणी देखील करणार असल्याचे आमदार लाड यांनी म्हटले.

मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचे कार्यकर्ते आहे. ते प्रामाणिकपणे काम करत आहेत. आम्ही कायम त्यांच्या मागे आहोत. त्यांची कुठेही बदनामी होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. ज्यांनी कोणी खोट-नाट केलं, त्यांना सर्व मिळून खोटं पाडू, असे देखील आमदार लाड यांनी म्हटले.

100 कोटींप्रमाणेच 500 कोटी.....

खासदार श्रीकांत शिंदे यांनी या प्रकरणावर दिलेल्या प्रतिक्रियेवर बोलताना, खासदार शिंदे यांचे बरोबर आहे. 500 कोटी खूप मोठी रक्कम आहे. ती कसे दिसते, याची उत्सुकता आहे. ती हातातून, बागेतून, गाडीतून नेता येत नाही. श्रीकांत शिंदेंना जो प्रश्न पडला आहे, तो मला देखील पडलाय, असे सांगतानाच, उद्धव ठाकरेंजींच्या काळात जसे 100 कोटी जमा केले, त्याचपद्धतीने आता पाचशे कोटी जमा करायचे होते की काय? असा गंभीर प्रश्न आमदार लाड यांनी उपस्थित केला.

एकनाथ शिंदे आमचे नेते.....

यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. ही टेप कोणी कुणापर्यंत कशी पोहोचवली याचा देखील शोध घेतला जाईल. मनोज जरांगे सारख्या प्रामाणिक माणसाला वेगळ्या दिशेला नेण्याचे काम केले जात आहे. महायुतीत एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत. ते राहतील देखील. त्यांचे पंख कापण्याइतपत ते छोटे नाही. त्यांना संपूर्णपणे देवेंद्र, अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांचे बळ आहे. आम्ही सगळे त्यांच्यामागे ताकदीने उभे आहोत, असेही आमदार लाड यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT