Viral Audio Clip Controversy: जरांगेंना ऑडिओ क्लिप कोणी दिली? संशयाची सुई भाजपच्या बड्या नेत्यांकडे? शिवसेना नेत्याच्या दाव्याने महायुतीत खळबळ!

Jarange Patil 500 crore allegation:मनोज जरांगे पाटील यांच्या कथित ऑडिओ क्लिपवरून बच्चू कडू यांनी चौकशीची मागणी केली आहे. त्यांच्या दाव्यामुळे महायुतीतील राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे.
Manoj Jarange 500 Crore Audio Clip Controversy; Devendra Fadnavis And Eknath Shinde
Manoj Jarange 500 Crore Audio Clip Controversy; Devendra Fadnavis And Eknath ShindeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या कथित ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच शिवसेनेचे नेते बच्चू कडू यांनी या प्रकरणाला नवे वळण दिले आहे. या क्लिपमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला असून, भाजपचीही प्रतिमा मलिन झाली आहे, असा दावा कडू यांनी केला.

एका कार्यालयातील कारकुनामार्फत ही क्लिप जरांगे यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्याची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामागे नेमके कोण आहे, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

पुण्यात माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी या प्रकरणावर भाष्य केले. ‘या सगळ्यामागे झारीतील शुक्राचार्य कोण आहे, हे शोधले पाहिजे,’ असे म्हणत त्यांनी ऑडिओ क्लिपच्या स्रोताची आणि ती समोर आणण्यामागील हेतूची चौकशी करण्याची मागणी केली.

भाजपचे मोठे नेते यात आहेत का?

कथित ऑडिओ क्लिपमधील ५०० कोटी रुपयांच्या उल्लेखावर बोलताना कडू यांनी हा विषय केवळ आर्थिक व्यवहारापुरता मर्यादित नसल्याचे सूचित केले. या क्लिपमधील महिलेने मोठेपणाचा आव आणण्याचा प्रयत्न केला असावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. मात्र, या प्रकरणामुळे महायुतीतील भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये दुरावा निर्माण होण्याची परिस्थिती तयार झाल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये फूट पडते की काय अशी अवस्था निर्माण झाली असल्या तर त्यांनी बोलून दाखवलं.

Manoj Jarange 500 Crore Audio Clip Controversy; Devendra Fadnavis And Eknath Shinde
Shiv Sena Leader Threat: शिवसेनेच्या उपमहापौरांना संपवण्यासाठी 5 लाखाची सुपारी? व्हिडीओ कॉलवर जीवे मारण्याची धमकी

एका कार्यालयातील कारकुनाने ही क्लिप एकत्रित करून जरांगे यांच्यापर्यंत पोहोचवली असावी, असा दावा करताना यामागे भाजपचे मोठे नेते आहेत का, याचाही तपास झाला पाहिजे, असे कडू यांनी सांगितले आहे.

Manoj Jarange 500 Crore Audio Clip Controversy; Devendra Fadnavis And Eknath Shinde
Pune Diwali Holiday 2026: पुणे जिल्ह्यात दिवाळीच्या सुट्टीत बदल! नवा आदेश; कोणत्या कार्यालयांना लागू होणार, आता 9 नोव्हेंबरला सुटी

महायुतीच्या नेत्यांनी एकत्र बसावे!

या प्रकरणामुळे एकनाथ शिंदे आणि भाजप या दोघांचीही बदनामी होत असल्याचे कडू यांनी म्हटले. भाजप निवडणुकीसाठी कोणत्या प्रकारच्या रणनीतीचा वापर करते, हे या प्रकरणातून समोर आल्याचा आरोपही त्यांनी केला.

‘महायुतीच्या नेत्यांनी एकत्र बसून दूध का दूध, पाणी का पाणी केले पाहिजे,’ असे सांगत कडू यांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. ऑडिओ क्लिप नेमकी कुठून आली, ती कोणी एकत्रित केली आणि ती समोर आणण्यामागे कोणाचा हेतू होता, या प्रश्नांची उत्तरे तपासातून मिळाली पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com