BJP Leader Laxman Savji Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP v/s Shivsena Politics : शिवसेनेला मोर्चा काढण्याचा अधिकार आहे का?

BJP says Shivsena have no right to criticize state Government-भाजप नेते लक्ष्मण सावजी यांनी ड्रग्जप्रकरणी शिवसेनेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले

Sampat Devgire

BJP leader Laxman Savji News : शिवसेना आज शहरातील ड्रग्ज प्रश्नावर राज्य सरकारवर दोषारोप करीत आहे. सरकारच्या विरोधात मोर्चा काढत आहेत. मात्र, त्यांनी त्यांचा इतिहास काढून पाहावा, त्यांना मोर्चा काढण्याचा अधिकार आहे का? असा सवाल भाजपचे प्रदेश सचिव लक्ष्मण सावजी यांनी केला आहे. (BJP criticized Shivsena on there political move on Drugs Issue)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भारतीय जनता पक्ष (BJP) शिवसेनेच्या (Shivsena) मोर्चाबाबत आक्रमक झाला आहे. संतप्त नेत्यांनी याबाबत नाशिक (Nashik) शहरातील शिवसेनेचा इतिहास पाहावा, असा सल्ला त्यांना दिला आहे.

मुंबई पोलिसांनी कारवाई करून नाशिकमधील ‘एमडी’ ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केला. याबाबत नाशिकच्या पोलिसांना मात्र या कारवाईबाबत काहीही माहिती नव्हती. त्यानंतर विविध आरोप, प्रत्यारोप सुरू झाले. त्यात थेट पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर आरोप करतानाच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टीकेचे लक्ष्य करण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर सावजी म्हणाले, शिवसेनेने आपला इतिहास काढून पाहावा. जो या प्रकरणातील आरोपी आहे, तो कोण आहे. त्याचे कोणाशी संबंध होते. तो कोणत्या पक्षाचा होता. त्याचे फेसबुक व व्हाॅटस्ॲप तपासले तर त्यात सर्व शिवसेनेच्या नेत्यांसमवेत फोटो होते. तो उपनगर भागात शिवसेना नेत्यांचे होर्डिंग्ज लावत होता. त्यामुळे जो आरोपी आहे, त्याबाबत शिवसेनेला तरी काहीही बोलण्याचा अधिकार नाही.

सावजी यांनी शिवसेनेने ड्रग्ज प्रकरणावर मोर्चा काढणे हेच हास्यास्पद आहे. कारण तसा त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही. तरीही ते मोर्चा काढतात, राज्य सरकारवर टीका करतात, हे पाहून जनतेचे केवळ मनोरंजन होत आहे. त्यापलीकडे या मोर्चातून काहीही साध्य होणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT