Shivsena on Drugs : शिक्षण विभागाचा ड्रग्ज आणि गुन्हेगारीला पाठिंबा आहे का?

Education department issued a order against Shivsena`s anti drug morcha-उडता पंजाबसारखा उडता महाराष्ट्र होऊ नये, यासाठी आज शिवसेना काढते आहे मोर्चा
Education Department Order
Education Department OrderSarkarnama
Published on
Updated on

Shivsena Nashik News : शहरातील ड्रग्जपासून दूर राहण्यासाठी महाविद्यालयांतून जनजागृती होत आहे. याबाबत शिवसेना आज मोर्चा काढणार आहे. मात्र, शिक्षण विभागाने या मोर्चात सहभागी होऊ नये, असे परिपत्रक काढले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मोर्चाआधीच प्रशासनाला हु़डहुडी भरल्याची टीका माजी नगरसेवक प्रशांत दिवे यांनी केली आहे. (Education officer issued a office order for school & Collages)

शहरातील (Nashik) ड्रग्जचे उत्पादन, व्यवसाय, वितरण याविरोधात समाजात जागृती व्हावी. पोलिसांनी (Police) त्याबाबत कारवाई करावी, यासाठी शिवसेना (Shivsena) आज शहरात मोर्चा काढणार आहे.

Education Department Order
Uday Samant On Khadse:'...म्हणून खडसेंना मंत्रिपदावरून जावं लागलं'; उद्योगमंत्री सामंतांचा गौप्यस्फोट

शहरातील भावी पिढीला अमली पदार्थांच्या संकटातून वाचविण्यासह या धोक्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी शिवसेना आज शहरात मोठा मोर्चा काढणार आहे. त्यावर प्रशासनाची बारीक नजर आहे.

गेले काही दिवस शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते शहरातील विविध शैक्षणिक संस्था, महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारांवर जाऊन जनजागृती करीत आहेत. युवकांनी ड्रग्जच्या विळख्यातून बाहेर पडावे. त्यापासून दूर राहावे. याबाबत निघणाऱ्या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन केले जात आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने शिवसेनेचा उत्साह वाढला आहे.

या मोर्चाचा प्रशासनानेदेखील चांगलाच धसका घेतला आहे. त्यामुळे काल सरकारी यंत्रणा अचानक जागी झाली. एरव्ही अजगरासारखा सुस्त असणारा शिक्षण विभागदेखील सक्रिय झाला. शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव आणि प्रवीण पाटील यांनी आदेश काढला. ‘ड्रग्जविरोधी मोर्चात सहभागी झाल्यास कारवाई करण्यात येईल. ड्रग्ज, एमडी, रोलेट व अवैध धंद्यांच्या संदर्भात मोर्चा निघणार आहे. त्यात विद्यार्थ्यांना सहभागी होण्यास परवानगी देऊ नये’ असे त्यात म्हटले आहे.

याबाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. खरे तर हे शिक्षण विभागाचे कार्य आहे. ते शिवसेना करते आहे. शिवसेना ८० टक्के समाजकारण करणारी संघटना आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या भूमिकेने धक्का बसला, असे प्रशात दिवे यांनी सांगितले.

Education Department Order
Mahesh Landge News : आमदार महेश लांडगेंनी मागितली पटेल समाजाची माफी !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com