Mahesh Landge News :
Mahesh Landge News : Sarkarnama

Mahesh Landge News : आमदार महेश लांडगेंनी मागितली पटेल समाजाची माफी !

Pimpri-Chinchwad Politics पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आवारात दोन दिवसांपूर्वी एका बिल्डरला मारहाण करण्यात आली होती.
Published on

Pimpri-Chinchwad Political News : भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांच्या कट्टर समर्थक, त्यांच्या मतदारसंघातील मोशी येथील पक्षाच्या माजी नगरसेविका सारिका सस्ते-बोराडे यांचे पती नितीन बोऱ्हाडे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आवारातच परवा (ता.१८ ) सायंकाळी बिल्डर तथा उद्योजक नरेश पटेलला मारहाण केली. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. त्यातून घाबरलेला बिल्डरच नाही, तर शहरातील दीड हजार पटेल समाज बांधवांनी आ. लांडगेंच्या निवासस्थानी काल रात्री धाव घेतली. या वेळी त्यांनी मोठे औदार्य दाखवित नरेश पटेलच नाही, तर संपूर्ण पटेल समाजाची जाहीर माफी मागितली.

Mahesh Landge News :
Manoj Jarange Patil Pune News : "२४ तारखेपर्यंत शांत राहू, नंतर भूमिका स्पष्ट करणार; जरांगेंचा पुनर्रुच्चार : आज तोफ धडाडणार

बोऱ्हाडे हे आ. लांडगेंचे समर्थक असल्यामुळे पटेल समाजाने महेशदादांना साकडे घातले. या वेळी चुकीच्या गोष्टीचे कधीही समर्थन करणार नाही, असे सांगत आपल्या सोबत आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली. पिंपरी-चिंचवडचा जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून बोऱ्हाडेंच्या कृत्याबद्दल त्यांनी आलेल्या दीड हजार पटेल समाजबांधवांची माफी मागितली. पुढील काळात उद्योजक, व्यावसायिक आणि भूमिपुत्र यांच्यात वादाचा प्रसंग होणार नाही, असा शब्दही दिला. एकत्रित शहराचा विकास करू, अशी सादही घातली.

पटेल समाजाचे दिलीप पटेल या वेळी म्हणाले की, ‘‘यह पटेल समाज आप के साथ रहा है। हम सब मिलजुल कर काम कर रहें है। पटेल परिवार शांती से रहता है। महेशदादा आपको इस विवाद में समझोता करना होगा। यावर आ. लांडगेंनी माफी मागताच ‘‘दादा आप क्यों माफी मांग रहे हो। हम आप के भरोसे है। आप को माफी मांगने की जरुरत नहीं। अशा शब्दांत पटेल बांधवांनी भावना व्यक्त केल्या.

आ. लांडगे म्हणाले, गैरसमज वा व्यावसायिक वादातून असा प्रकार घडला असेल. नरेश पटेल यांच्याबाबत झालेली कृती चुकीची होती. याबाबत नितीन बोऱ्हाडे आणि नरेश पटेल यांची आगामी दोन-तीन दिवसांत बैठक घेऊन हा वाद मिटवला जाईल. तसेच भविष्य़ात असा प्रकार होणार नाही, याची खबरदारी घेऊ, असे ते म्हणाल्याने पटेल समाज आश्वस्त झाला.

Edited By- Anuradha Dhawade

Mahesh Landge News :
Reservation News : खरंच, श्रीमंतांना आरक्षण असावं का? कळीच्या मुद्द्यावर बोलणार कोण?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com