Mayor Pratibha Choudhary & Sharad Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dhule Politics on Statue : पंडित नेहरूंच्या पुतळ्यावरून शिवसेना भाजपमध्ये जोरदार तू तू मैं मैं!

Sampat Devgire

BJP v/s Shivsena politics : धुळे शहरातील अतिक्रमणांनी वेढलेल्या राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांबाबतदेखील राजकारण रंगले आहे. शिवसेनेचे माजी आमदार शरद पाटील यांनी याबाबत महापौरांचे लक्ष वेधले होते. त्यावर लोकमान्य टिळकांचा पुतळ्याची अतिक्रमणातून सुटका होणार आहे. मात्र, पंडित नेहरू यांच्या पुतळ्याबाबत चक्क दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप झाला. (Shivsena criticized BJP Mayor on Statu encroachments)

धुळे महापालिकेत (Dhule) भाजपची (BJP) सत्ता आहे. महापौर प्रतिभा चौधरी आणि शिवसेनेचे (Shivsena) जिल्हाप्रमुख शरद पाटील यांच्याच चांगलाच वाद रंगला. त्यामुळे शहराच्या हद्दवाढीबाबत झालेली बैठक पुतळ्यांवरून गाजल्याने आगामी काळात यावर राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत.

धुळे महापालिकेच्या महापौर श्रीमती चौधरी यांनी महापालिकेत याबाबत बैठक घेतली होती. त्यात हद्दवाढीमुळे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली. या गावांचा महापालिकेत समावेश केल्याने काही प्रतिनिधींची नाराजी होती. त्याबबात महापौरांनी गद्दवाढीनंतर दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती दिली.

ही बैठक गाजली ती मात्र वेगळ्याच कारणासाठी. बैठकीत महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाचेस माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्यात शहरातील महापुरुषांच्या स्मारकांच्या जागांवरून जुंपल्याचे पाहायला मिळाले.

प्रा. पाटील यांनी धुळे शहरात अनेक महापुरुषांची स्मारके रस्त्याच्या मधोमध असल्याने वाहतुकीचा प्रश्‍न निर्माण होतो. त्यामुळे असे सर्व पुतळे योग्य ठिकाणी हलविण्यात यावेत, साक्री रोडवरही पुतळा रस्त्यामध्ये असून, तोही योग्य ठिकाणी हलवावा, अशी मागणी झाली.

महापालिकेतील सत्ताधारी भाजपमुळे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रा. पाटील यांनी केला. त्यावर महापौर श्रीमती चौधरी यांनी महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना आपण हा पुतळा का हलवला नाही, अशी विचारणा केली. हद्दवाढ क्षेत्रातील प्रारूप विकास योजनेवरच बोला इतर प्रश्‍न उपस्थित करू नका, असे महापौर म्हणाल्या. आता याबाबत अन्य पक्ष भाजपला घेरण्याच्या तयारीत असल्याने या विषयावर राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT