Nashik Water issue: आमदार डॉ. राहुल आहेर यांनी पाणीप्रश्नावर अचुक निदान केले!

Maharashtra Politics on Drought, Water issue became serious in Nashik-आमदार आहेर यांनी कालव्यांतून पाणी मिळत नसेल तर, जलसंपदा विभाग कशाला पाहिजे? या शब्दात प्रशासनाला खडसावले
Dr. Rahul Aher
Dr. Rahul AherSarkarnama
Published on
Updated on

BJP MLA Rahul Aher News : तीव्र दुष्काळ असताना देखील धरणांच्या कालव्यांच्या टेलला पाणी पोहोचत नसेल, तर जलसंपदा विभाग हवा कशाला?. दुष्काळाने हैरान जनतेला दिलासा कोण देईल, असा नेमका प्रश्न भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केला आहे. (Government should solve the canal water issue atleast in Drought situation)

नाशिक (Nashik) जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती तीव्र आहे. भाजप (BJP) आमदार आहेर (Dr. Rahul Aher) यांच्या चांदवड-देवळा मतदारसंघात दिर्घकाळ पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने त्यावर तोडगा शोधण्याची मागणी पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्याकडे करण्यात आली आहे.

Dr. Rahul Aher
Raj Thackeray News : राज ठाकरेंच्या शिलेदारांचा इगतपुरीत अनपेक्षित चौकार!

दुष्काळामुळे सर्वच आमदारांना पाणी हेच उत्तर वाटते. त्यामुळे धरणे आणि कालव्यांबाबत सातत्याने चर्चा सुरू आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत देखील याविषयी आमदारांनी तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे हा विषय सध्या राजकीय बनला आहे.

कुठल्याही धरणातून पाणी आरक्षित नसलेल्या दुष्काळग्रस्त गावांना पाणीपुरवठा कसा होईल, याचे सूक्ष्म नियोजन न करता मागील वर्षीचे आकडे सादर करत जलसंपदा विभागाने धूळफेक केली आहे. दुष्काळग्रस्त गावांना पाणी मिळाले नाही तर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना सोडणार नाही, असा थेट इशारा आमदार डॉ. आहेर यांनी ओझरखेड आणि चणकापूर धरणांच्या कालव्यांबाबत दिला आहे.

जिल्ह्यात यंदा तीव्र दुष्काळ आहे. टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याने पिके व फळबागा टिकविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. अशा परिस्थितीत पाटाला पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने कसे केले आहे, याविषयी आमदारांनी विचारणा केली आहे.

Dr. Rahul Aher
Maharashtra Politics : शानेहिंद यांचा ठाकरे, शरद पवारांना टाटा, समाजवादीत प्रवेश करणार!

चांदवड तालुक्यातील वाहेगाव, वाकी या गावांना पाणी कसे देणार, याविषयी आमदार डॉ. आहेरांनी प्रश्न प्रशासनाला केला. दुष्काळात देखील पाणी देऊ शकत नसेल तर हा विभाग हवा कशाला?, असा प्रश्न करीत त्यांनी दुखण्यावर नेमके बोट ठेवले आहे. याबाबत जिल्हाधिकारी उद्या यासंदर्भात बैठक घेणार आहेत. त्यात ओझरखेड व चणकापूर या धरणांतून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे नियोजन व पाण्याच्या आकस्मिक आरक्षण निश्चितीवर चर्चा होईल.

Dr. Rahul Aher
Nashik Water issue : पालकमंत्री दादा भुसे म्हणाले, तूर्त जायकवाडीला पाणी नकोच!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com