Chandrashekhar Bawankule Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : 'धर्मावरून राजकारण करणाऱ्यांना त्यांचे...' : बावनकुळेंचं वक्तव्य!

सरकारनामा ब्युरो

अरविंद जाधव-

Nahik News : राम मंदिराचे निर्माण अथवा धर्माचे राजकारण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही रामभक्त आहोत आणि राहणार. मात्र धर्मावरून राजकारण करणाऱ्यांना त्यांचे राजकारण लखलाभ असे सांगत विरोधांकडून होणाऱ्या टीकेला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले.

सध्या नाशिक जिल्ह्यात भक्तिमय वातावरण तयार झाले आहे. भाजपही त्यासाठी मैदानात उतरली आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्यापाठोपाठ आज प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी काळाराम मंदिरात श्रीरामाचे दर्शन घेतले. यावेळी पत्रकारांशी बोलताना मात्र त्यांनी भाजप राम मंदिराचा पक्षीय फायदा घेत असल्याच्या आरोपाचा इन्कार केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याचबरोबर आम्ही रामभक्त आहोत. आमची श्रद्धा आहे. यापूर्वी मी त्र्यंबकेश्वराला दर्शनाला गेलो होतो. आज आम्ही काळाराम मंदिरात पोहोचलो. मंदिराच्या परिसरात राजकारणावर बोलणे योग्य नसल्याचे स्पष्ट करीत बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी भाजपला धर्म अथवा राम मंदिराचे राजकारण करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले.

विरोधकांकडून याबाबत होत असलेल्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिले. बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) गॅरींटीच मोठी आहे. पंतप्रधानांकडून आजवर झालेल्या कामांचा लेखाजोखा आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतो आहे. आम्हाला विजयासाठी तेवढे पुरसे आहे. मात्र, धर्म आणि राम मंदिरावरून राजकारण करणाऱ्यांना त्यांचे राजकारण लखलाभ.

याचबरोबर 'काळाराम मंदिरात दर्शनाला येणं, गोदाआरती करणे याचा राजकारणाशी संबंध नाही. राम मंदिराच्या 22 तारखेच्या सोहळ्याचा आनंद घराघरात दिसून येतो आहे. काळाराम मंदिरातही त्यादिवशी विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे बावनकुळेंनी स्पष्ट केले.

दरम्यान, शरद पवार(Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून सातत्याने राम मंदिर प्रश्नी भाजपावर टीका होते आहे. भाजपा विकासाच्या कामापेक्षा धर्माच्या राजकाराणाला पुढे आणत असल्याचा आरोप विरोधकांकडून होतो आहे. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्षांनी मांडलेली भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT