Ram Mandir : ठाकरेंनी दर्शनरांगेत वा घरात बसूनच राम मंदिराचा सोहळा बघावा; 'या' नेत्याचा खोचक सल्ला

Uddhav Thackeray News : सोहळ्याच्या निमंत्रणावरून राजकीय क्षेत्रात वादळ उठले आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

प्रसाद जोशी-

Parbhani News : अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी होत आहे. या सोहळ्यावरून राज्यात चांगलेच राजकारण तापले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व भाजपच्या नेत्यांमध्ये निमंत्रणावरून कलगी-तुरा सुरू आहे. यात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनीही उडी घेत उद्धव ठाकरे यांना घरात भलामोठा एलसीडी स्क्रीन लावून राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा बघावा, असा सल्ला दिला आहे.

नरेंद्र पाटील हे मंगळवारी (ता. 9) परभणी दौऱ्यावर आले होते. या पत्रकार परिषदेत त्यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यांनी यावेळी राम मंदिराच्या सोहळ्याच्या निमंत्रणावरून उठलेल्या राजकीय वादावर थेट भाष्य केले. ते म्हणाले, भारत देश हा रामचंद्रांच्या नावानेच ओळखला जातो. अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या जन्मस्थानावरअसलेली वादग्रस्त वास्तू रामभक्तांनी पाडली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 22 जानेवारी रोजी कायदेशीर मार्गाने त्या जागेवर राम मंदिर उभारले जात आहे. त्याचा मला व संपूर्ण देशाला आनंद झाला आहे.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray News : 'उद्या वेडावाकडा निकाल दिला तर..' ; आमदार अपात्रता प्रकरणी ठाकरेंचा सूचक...

ज्या रामभक्तांनी अयोध्येत कारसेवा केली, त्यांच्याबद्दल एकीकडे टीका करायची आणि दुसरीकडे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण न मिळाल्याबद्दल ओरड करायची हा दुटप्पीपणा आहे. त्यांना राम मंदिराबद्दल आपुलकी असेल तर त्यांनी घरातूनच हा सोहळा बघावा, असा टोला नरेंद्र पाटलांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लगावला. 22 जानेवारी रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते होणाऱ्या या सोहळ्यासाठी मंदिर ट्रस्टकडून देश-विदेशातील अभ्यागतांना निमंत्रण पाठवले जात आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषदेच्या वतीने देशभरातील प्रत्येक गावात विविध उपक्रम आयोजित करून वातावरणनिर्मिती केली जात आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्तेही उपक्रमात सहभागी होत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सोहळ्याच्या निमंत्रणावरून राजकीय क्षेत्रात वादळ उठले आहे. नरेंद्र पाटील (Narednra Patil) हे परभणी दौऱ्यावर आले असताना माध्यमांशी बोलत होते. भारत देश हा रामचंद्रांच्या नावानेच ओळखला जातो. अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या जन्मस्थानावर असलेली वादग्रस्त वास्तू रामभक्तांनी पाडली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 22 जानेवारी रोजी कायदेशीर मार्गाने त्या जागेवर राम मंदिर उभारले जात आहे. त्याचा मला व सर्व भारतवासीयांना आनंद आहे.

या दिवशी आनंदोत्सव साजरा करावा, संपूर्ण विश्वात श्रीरामाचा जयजयकार व्हावा, असे आवाहन पंतप्रधानांनी देशवासीयांना केले आहे. अशा आनंदाच्या प्रसंगी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी राम मंदिराबाबत वेगवेगळ्या पद्धतीने भूमिका मांडल्यामुळे रामभक्तांच्या भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळे अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमंत्रणाची त्यांनी अपेक्षाच करू नये.

Uddhav Thackeray
Loksabha Election 2024 : कोल्हापुरात लोकसभेची उमेदवारी राजकीय घराण्यात की नव्या चेहऱ्याला संधी?

अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी ज्यांनी मेहनत केली, कारसेवा केली त्यांच्याबद्दल टीका करायची आणि सोहळ्याचे निमंत्रण आले नाही, म्हणून ओरड करायची हे चुकीचे आहे. त्यांना मंदिराबद्दल एवढीच आपुलकी असेल तर त्यांनी दर्शनरांगेत उभे राहून दर्शन घ्यावे किंवा घरात मोठा एलसीडी लावून सोहळा बघावा, असा खोचक सल्ला नरेंद्र पाटील यांनी यावेळी दिला.

(Edited By Deepak Kulkarni)

R...

Uddhav Thackeray
Vikhe Patil News : विखेंनी एका वाक्यात संपवून टाकला लंकेंच्या लोकसभेचा विषय!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com