Chandrashekhar Bawankule Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Politics : मंदिरांची स्वच्छता, पण लक्ष्य मतदारच ? भाजप लागली निवडणुकीच्या कामाला

सरकारनामा ब्यूरो

अरविंद जाधव

Maharashtra BJP Political News : भाजप कायम 'इलेक्शन मोड'मध्ये असते, असे वारंवार बोलले जाते. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी राम मंदिराचे होणारे लोकार्पणही त्याचाच एक भाग असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी २२ जानेवारीपर्यंत मंत्री, आमदार, कार्यकर्त्यांनी आपल्या घराजवळील मंदिरे स्वच्छ करावीत. तिथे वेळ घालवा, असे स्पष्ट आदेशच दिले आहेत. या माध्यमातून भाजप निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतपेरणी करीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून होऊ लागली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी भाजप कोअर कमिटीतील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मंत्री व आमदारांचा समाजातील सक्रीय वावर वाढवण्याबाबत तसेच निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना नारळ देण्याची तंबी त्यांनी दिली. भाजपाचे हिंदुत्वाचे कार्ड आणखी मजबूत करण्यासाठी बावनकुळे यांनी लोकप्रतिनिधींना विशेष मंत्रही दिला आहे.

राम मंदिर निर्माण करण्याचे स्वप्न प्रत्यक्ष अवतरले आहे. एक भक्तिमय वातावरण तयार झाले आहे. यावर बावनकुळे म्हणाले, 'राम मंदिराचे निर्माण हे पक्षाने दिलेले आश्वासन पूर्ण झाले आहे. त्यामुळे आश्वासनपूर्तीच्या कार्यक्रमाचे आयोजन करावे,' असे निर्देशही बावनकुळेंनी दिले. आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत राम मंदिरासंबंधित वेगवेगळे कार्यक्रम आयोजित होतील. तसेच यानिमित्ताने मतदारांशी थेट संपर्क वाढेल, अशीच काहीशी रणनीती भाजपने आखल्याचे दिसत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बावनकुळे म्हणाले, '22 जानेवारीपर्यंत घराजवळील मंदिरामध्ये स्वच्छता मोहीम राबवणे, तिथे वेळ देणे, राम मंदिर निमंत्रणाच्या अक्षता स्वत: घरोघरी पोहोचवावी,' अशी सूचना बावनकुळेंनी सर्व पदाधिकाऱ्यांना दिली आहे. आता बावनकुळे यांनी दिलेल्या सूचनांचे पालन आमदार व खासदार कसे करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पंचवटीत झालेल्या बैठकीला प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आमदार राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सीमा हिरे, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, भाजपानेते लक्ष्मण सावजी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT