Uddhav Thackeray : ‘मर्द आहे' म्हणायचं अन् रडत बसायचं; सत्तासंघर्षाच्या निकालापूर्वी भाजपचा ठाकरेंना टोला

Ashish Shelar : 'टूटे मन से कोई खड़ा नहीं होता...' आशिष शेलारांची खरमरीत टीका
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल काही तासांवर लागणार आहे. दरम्यान, विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अध्यक्षांच्या निष्पक्षपातीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावरून ठाकरे 'मर्द आहे' म्हणतात आणि रडत बसतात. ते नेहमीच रडगाणे गातात, असे म्हणत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी सडकून टीका केली. तसेच ठाकरे खचले असून ते लढाईत उभे राहू शकत नाहीत, असा टोलाही लगावला आहे.

आशिष शेलारांनी ट्विटरवरून ठाकरेंचा समाचार घेतला आहे. यावेळी त्यांनी ठाकरे कधी आणि कशासाठी रडत होते, याची यादीच दिली आहे. शेलार म्हणाले, 'ठाकरे भाजपसोबत सत्तेत होते तेव्हा रडत होते. नंतर मुख्यमंत्रिपदासाठी त्यांनी खेळी केली. जुगाड करून मुख्यमंत्रिपद मिळविले, तरीही त्यांचे समाधान झाले नाही. पक्षप्रमुख होते आणि त्यांचा पक्ष फुटला. त्यानंतरही ते आमच्या नावाने खडे फोडत होते. भाजपने अनेक राज्ये जिंकली. राम मंदिर उभे केले. आता निमंत्रण नाही म्हणून रडत आहेत.'

Uddhav Thackeray
BJP Politics : आता चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री होतील... : काँग्रेसच्या बड्या नेत्याचं सूचक वक्तव्य

ठाकरेंचे रडगाणे आताही कायम असल्याचे शेलारांनी म्हटले आहे. 'सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा त्यांच्या बाजूने आला, तेव्हाही ठाकरेंचे रडणे सुरूच होते. त्यानंतर आज विधानसभाध्यक्ष आमदार अपात्रतेवर निकाल देणार, असे कळल्यापासून तर ठाकरे गटातील प्रमुखासह सर्वांचेच रडगाणे सुरू झाले आहे. 'मर्द आहे' असं म्हणायचं आणि सतत रडत बसायचं,' असा टोलाही शेलारांनी यावेळी लगावला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पक्ष फुटल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे खच्चीकरण झाले आहे. मुख्यमंत्रिपद गेल्याने ठाकरे खचले आहेत. भाषणात कितीही मर्द म्हणवून घेत असले तरी ते कायमच रडत बसतात. ठाकरे छोट्या मनाचे आहेत. मनातून हरलेले कुणीही लढाई जिंकत नाहीत, असे म्हणत शेलारांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेच्या माध्यमातून ठाकरेंवर निशाणा साधला.

(Edited by Sunil Dhumal)

R...

Uddhav Thackeray
Rajya Sabha Election : एकही आमदार न जिंकलेल्या राज्यात भाजपने दिला उमेदवार; इतिहास घडणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com