Kunal Patil & Dr. Subhash Bhamre
Kunal Patil & Dr. Subhash Bhamre Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dhule APMC News: काँग्रेसच्या कुणाल पाटील यांच्यापुढे भाजप नेत्यांची सत्वपरीक्षा

Sampat Devgire

BJP leaders starts negotiation: धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांचे वर्चस्व आहे. हे वर्चस्व मोडून काढण्यासाठी शहरातील भाजपचे सर्व नेते, लोकप्रतिनिधी एकत्र आले आहेत. त्यांनी विरोधी भदाणे गटालाही जागावाटपात स्थान देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे भाजप नेत्यांची ही परिक्षाच ठरण्याची शक्यता आहे. (Dhule APMC election taken a serious political mode)

काँग्रेस (Congress) आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) यांच्या विरोधात भाजपचे (BJP) खासदार डॉ. सुभाष भामरे (Dr. Subhash Bhamre) यांसह सर्वच नेते एकत्र आले आहेत. त्यांनी पाटील विरोधक भदाणे गटालाही जागावाटपात मधाचे बोट दाखविले आहे. त्यामुळे यंदाची निवडणुक भाजप नेत्यांसाठी सत्त्वपरीक्षा ठरण्याची शक्यता आहे.

धुळे बाजार समितीवर माजी मंत्री रोहिदास पाटील आणि आमदार कुणाल पाटील यांचा एकछत्री अंमल राहिला आहे. त्यांना समितीच्या प्रत्येक निवडणुकीत विरोधकांनी पराभूत करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, पाटीलव्दयींच्या सत्तेला अद्याप कुणी भेदू शकलेले नाही. या स्थितीत आमदार पाटील यांना शह देण्यासाठी भाजपने क्षमतेने रिंगण्यात उतरण्याचे ठरविले आहे. त्यासाठी या पक्षाचे धुळे तालुक्यातील सर्व नेतेमंडळी, प्रमुख पदाधिकारी एकवटले आहेत.

जिल्ह्यात सर्वाधिक चुरशीच्या ठरणाऱ्या धुळे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकींतर्गत काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांना शह देण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. अशात बोरकुंड (ता. धुळे) येथील प्रथम लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे यांनी तिसऱ्या पर्यायाची साद घालत रंगत वाढविली आहे. त्यात भाजप व भदाणे गटाने एकत्रित पॅनल दिले तर आमदार पाटील यांना अधिक क्षमतेने शह देता येईल, अशा विचारातून भाजप व भदाणे गटात जागा वाटपाबाबत वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. (Latest Political News)

भदाणे यांचे दबावतंत्र

या घडामोडी घडत असताना राजकीय महत्त्वाकांक्षा असलेले बोरकुंड येथील बाळासाहेब भदाणे यांनी तिसऱ्या पर्यायाची साद घातली. त्यांचे समर्थक व इतर पक्ष, संघटनांकडून उमेदवारी मिळणे अशक्य असलेले तिसरी आघाडी हा पर्याय मानत आहेत. या चलाख खेळीतून श्री. भदाणे यांनी दबावतंत्र तयार केले आणि ते यशस्वी ठरतानाचे चित्र आहे.

बाजार समिती निवडणुकीत प्रस्थापित आमदार पाटील यांना कडवी झुंज द्यायची असेल तर भाजप आणि भदाणे गट एकत्र आला पाहिजे आणि दोघांनी मिळून एकच पॅनल दिले पाहिजे, असा विचार त्यांच्या गोटातून पुढे आला. अन्यथा, आमदार पाटील, भाजप, भदाणे गटातील राजकीय कलहाचा प्रस्थापितांना लाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा मनोदय भाजप व भदाणे गटातील काही कार्यकर्त्यांकडून व्यक्त झाला.

जागा वाटपात वाटाघाटी

या पार्श्वभूमीवर भाजप आणि भदाणे गटात जागा वाटपाबाबत वाटाघाटी सुरू झाल्याची चर्चा लपून राहिलेली नाही. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत छाननीअंती ३२० पैकी ४० अर्ज बाद झाल्यावर २८० वैध अर्ज उरले आहेत. यात १८ जागांसाठी २८० अर्ज असल्याने इच्छुकांच्या माघारीसाठी आमदार पाटील आणि भाजपकडून खासदार डॉ. भामरे व अन्य नेतेमंडळींना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. या स्थितीत श्री. भदाणे यांनी भाजपकडे एकूण १८ पैकी ९ जागांची मागणी केली आहे. तेथून वाटाघाटी सुरू झाल्यावर ही मागणी आता ९ वरून ६ जागांवर आल्याचे गोटातून सांगण्यात येते. (Political Breaking News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT