Nashik Shivsena news : उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, हे लोकांना आता पटू लागले आहे. त्यामुळेच मोठया प्रमाणात कार्यकर्ते पुन्हा या पक्षात प्रवेश करीत आहेत. हा शुभ संकेतच म्हणावा लागेल, असे प्रतिपादन उपनेते सुनील बागूल यांनी केले. (Hundread activists joins Shivsena Thackeray Group in City)
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या विचारांनी प्रेरीत होऊ न शिवसैनिक (Shivsena) महेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली नाशिक (Nashik) पूर्व मतदार संघातील शेकडो तरुणांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला त्यावेळी बागूल बोलत होते. पक्षाच्या शालिमार कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला.
यावेळी उपस्थित सुनील बागुल तसेच जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, जिल्हा उपप्रमुख देवानंद बिरारी, महेश बडवे, सचिन मराठे, भारतीय विद्यार्थी सेना जिल्हा संघटक वैभव ठाकरे, माजी नगरसेवक डी. जी. सुर्यवंशी, गोकूळ पिगंळे, प्रेमलता जुन्नरे, मंदा दातीर, स्वाती पाटील आदींच्या हस्ते शिवबंधन बांधून या सर्वांचे पक्षात स्वागत करण्यात आले.
पक्षात आलेल्या सर्वांचा सन्मान बाळगला जाईल, असे जिल्हाध्यक्ष विजय करंजकर म्हणाले. गद्दार आज कितीही उड्या मारत असले तरी त्यांची खरी स्थिती काय आहे ते त्यांना चांगले ठाऊक आहे. त्यामुळे आता पश्चाताप करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायच उरलेला नाही, असे सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड आपल्या भाषणात म्हणाले.
महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवणुकीत गद्दार चांगलेच तोंडावर आपटतील आणि लोक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या बाजूनेच मोठया प्रमाणात कौल देतील आणि त्यावेळीच असली कोण आणि नकली कोण याचा फैसला होईल, असे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर म्हणाले.
पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये अजय गोसावी, उज्वल मोरे, आकाश महामाने, प्रविण निकम, यश गोसावी, आयुष भोई, प्रशांत निकम, ओंकार सूर्यवंशी, हितेश मराठे, दर्शन जाधव, संदीप वाघ, शुभम तांबे, किरण मोगल, मधुकर आव्हाड आदींचा समावेष आहे. पंचवटी परिसरातील शिवसेना व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.