Shivsena`s New appointment : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येहून परतताच त्यांनी महापालिका, जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला गती दिली आहे. यासंदर्भात काही नियुक्त्या केल्या जाणार आहेत. भाऊसाहेब चौधरी यांची सचिवपदी नियुक्ती केली आहे. ते उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्याच्या निवडणुकीचे नियोजन करणार आहेत. (Choudhary will coordinate with MLA for North Maharashtra elections)
मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shreekant Shinde) यांच्या उपस्थितीत आज श्री. चौधरी यांना शिवसेना (Shivsena) नियुक्ती पत्र दिले. त्यांनी आमदारांशी समन्वय निर्माण करून निवडणुकीच्या (Elections) तयारीवर लक्ष केंद्रीतस करायचे आहे. त्यासाठी निवडणूक समित्या तयार केल्या जातील.
महाराष्ट्रातील आगामी सार्वत्रिक निवडणुका, तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, बाजार समित्यांसह सहकार क्षेत्रातील निवडणुकांचे नियोजन करण्यासोबतच संघटनात्मक बांधणी व संघटनात्मक निर्णय घेण्याची जबाबदारी नवनियुक्त सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्यावर असेल.
या नियुक्तीपत्रात आगामी काळात नागरिकांत पक्षाविषयी जनजागृती, विविध प्रश्नांवर आंदोलने करणे आणि शिंदे सरकारने घेतलेल्या लोकाभिमुख निर्णय जनतेपर्यंत पोहोचवण्यात यावीत. संघटनात्मक दृष्टीने उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नगर, जळगाव आणि नंदुरबार विभागातील मंत्री, खासदार, आमदार, संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख यांची समिती नियुक्त केली जाईल. पक्षाने दिलेल्या कार्यक्रम राबविण्यात येतील.
राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांच्या निवडणुका सातत्याने लांबणीवर पडत आहेत. त्यादृष्टीने पक्षीय स्तरावर आता हा विषय गांभिर्याने घेऊन तयारी सुरु करण्याचे संकेत यातून मिळत आहेत. मुख्यमंत्री शिंदे नुकतेच अयोध्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही नियुक्ती केल्याने त्याला वेगळे राजकीय संदर्भ असल्याचे बोलले जाते.
पुढील आठवड्यात चार दिवस सर्व पाच तालुक्यांत दौरे करून लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी करून संघटनात्मक बांधणी केली जाईल. त्या माध्यमातूनच निवडणूक तयारी करण्यात येणार आहे. राज्यात सर्वाधिक वेगाने तसेच जलद निर्णय घेणारे शिवसेना, भाजप युती सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार आहे. त्यामुळे निश्चितच संघटनेत नवचौतन्य निर्माण होईल, असा विश्वास भाऊसाहेब चौधरी यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.