Nagar Rationing Black Market sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rationing Black Marketing : रेशनिंगमध्ये संगनमताने काळाबाजार अन् भाजप युवा मोर्चाचा इशारा...

Nagar News : नगरमध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात रेशनधारकांना धान्याचे वाटप केले गेले नसून, रेशनिंगच्या धान्यात दुकानदार आणि काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने मोठा काळा बाजार सुरू आहे, असा आरोप भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष मयुर बोचुघोळ यांनी केला.

Pradeep Pendhare

Nagar Rationing Black Market News : नगर शहरात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात रेशनधारकांना धान्याचे वाटप केले गेले नसून, रेशनिंगच्या धान्यात दुकानदार आणि काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने मोठा काळा बाजार (Rationing Black Market) सुरू आहे, असा आरोप भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे शहराध्यक्ष मयुर बोचुघोळ यांनी केला. या प्रकाराची मयुर बोचुघोळ यांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करत चौकशीची मागणी केली.

नगर शहरात रेशनिंगच्या अन्नधान्य वाटपात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांमध्ये वाटपाची टक्केवारी खूप कमी होती. मात्र पुढील महिन्यात अचानक अन्नधान्य वाटपाची टक्केवारी वाढली. हा खूप मोठा बदल कसा झाला. दोन महिन्यांमध्ये वाटप कमी झाले आणि यानंतर अचानक वाटप वाढले. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात लोक धान्य घेऊन का गेलेले नाहीत. मग ते धान्य कोठे गेले? याची चौकशी होणे गरजेचे आहे, असे भाजपचे (BJP) मयुर बोचुघोळ यांनी म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मयुर बोचुघोळ म्हणाले, "भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून सर्वसामान्य रेशनधारकांना नागरिकांना त्यांचे धान्य वेळेवर व पूर्ण मिळाले पाहिजे, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असतो". याप्रकरणी अनेकवेळा जिल्हा प्रशासनाशी पाठपुरावा करून देखील सुधारणा होताना दिसत नाही. रेशनिंग धान्याच्या वाटपात मोठी अनागोंदी आहे, असा आरोपही त्यांनी केला. Black market in distribution of foodgrains of rationing in the city

रेशनधारक ग्राहकांना दुकानदारांकडून धान्य मिळत नाही, अंत्योदय ग्राहकांना नियमाप्रमाणे लाभ मिळत नाही, धान्य दुकानदार पावती बिल देत नाही, रेशनकार्ड (Ration Card) मध्ये नाव असून सुद्धा दुकानदार धान्य कमी देत असेल किंवा अपमानास्पद वागणुक देणे, फोन न उचलणे व नियमित दुकान न उघडणे, अशा अनेक तक्रारी दुकानदारांविरोधात भाजप युवा मोर्चाकडे प्राप्त झाल्या आहेत.

रेशनधारकांना दुकानदार चुकीची माहिती सांगून अन्नधान्यपासून वंचित ठेवण्याचा प्रकार देखील करतो. यानंतर रेशनिंगचे अन्नधान्य काळ्याबाजारात जाते. याप्रकाराची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना माहिती नाही, असे नाही. या सर्व प्रकार संगनमताने चालतो. जिल्हा अन्न पुरवठा विभागाने कारभारात सुधारणा करावी. या संगनमत काळ्याबाजारावर नगर जिल्हा प्रशासनाने कारवाई करावी, अन्यथा जिल्हा अन्न पुरवठा विभागाविरोधात तीव्र आंदोलन करू, असा इशारा मयुर बोचुघोळ यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT