Nilesh Lanke News : चर्चा होणारच, नीलेश लंकेंना सासूरवाडीतून किती मताधिक्य?

Nagar South Constituency : खासदार सुजय विखे आणि नीलेश लंके यांच्यात नगर तालुक्यात काँटे की टक्कर झाली. दोघांकडील समर्थक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे नगर तालुक्यातून मताधिक्य कोणाला, याची चर्चा सुरू आहे.
Sujay Vikhe - Nilesh Lanke
Sujay Vikhe - Nilesh LankeSarkarnama

Lok Sabha Election 2024 Voting : लोकसभेच्या निवडणुकीनंतर उमेदवार माजी आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांच्याभोवती एकच चर्चा सुरू आहे ती, म्हणजे सासूरवाडीतून किती मताधिक्य? राहुरी विधानसभा मतदारसंघातील येत असलेल्या नगर तालुक्यातील अरणगाव ही नीलेश लंके यांची सासूरवाडी आहे. येथून नीलेश लंकेंना किती मताधिक्य असेल, याची चर्चा आणि पैजा लागल्या आहेत.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुती भाजपचे (BJP) उमेदवार खासदार सुजय विखे आणि महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके यांच्यात थेट लढत झाली. या मतदारसंघात निवडणुकीच्या मैदानात एकूण 25 उमेदवार होते. मात्र चर्चा रंगली आहे ती, विखे-लंके यांच्यात मताधिक्याची. यात नगर तालुक्यात सुजय विखे (Sujay Vikhe) आणि नीलेश लंके यांच्यात काँटे की टक्कर झाली. दोघांकडील समर्थक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. मात्र खासदार विखेसाठी भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी त्यांची प्रभावी यंत्रणा उभी केली. त्यामुळे नगर तालुक्यातून मताधिक्य कोणाला याची चर्चा सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sujay Vikhe - Nilesh Lanke
Nashik Constituency 2024 : निलेश लंके प्रकरणाने नाशिकची शिवसेना सावध, स्ट्राँगरूम विषयी केली 'ही' सूचना !

माजी आमदार नीलेश लंके यांची सासूरवाडी ही नगर तालुक्यातील अरणगाव. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नीलेश लंके यांच्या गटाने ग्रामपंचायत खेचून आणली. सत्तांतर घडवले. असे असले, तरी नगर तालुक्यात भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचा दबदबा आहे. नगर तालुक्यात 50 गावे येतात. अरणगावात देखील कर्डिले गटाचे वर्चस्व आहे. यातच नीलेश लंकेंची ती सासूरवाडी. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत अरणगावातून पर्यायाने नगर तालुक्यात कोणाला मताधिक्य असणार, याची चर्चा थांबायला तयार नाही. अरणगावाची जावयाला किती साथ मिळते, याची उत्सुकता लागली आहे. There is a discussion about who will have more votes from Nilesh Lankes in-laws

ही निवडणूक देशाची होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) जनसेवक म्हणून ओळखले जातात. जनतेच्या मनात तेच आहेत. त्यामुळे मतदारांनी स्थानिक हितापेक्षा देश हिताला प्राधान्य दिले आहे. नगर तालुक्यातील महायुतीच्या उमेदवार यांना 25 हजारांचे मताधिक्य असेल, असा दावा भाजपचे नगर जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांनी मात्र, भाजपचा हा दावा खोडून काढला. ग्रामीण भागात भाजपची शेतकरीविरुद्ध धोरणाविषयी रोष दिसला. भाजपच्या धोरणांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे केंद्रातील भाजप सरकारविरोधात नाराजी दिसली. यामुळे नगर तालुक्यात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला 30 हजारांचे मताधिक्य असेल, असा दावा केला.

Sujay Vikhe - Nilesh Lanke
Sharad Pawar News : 'जागे झाले नाही तर इतर मार्ग आहेत', शरद पवारांचा सरकारला इशारा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com