BJP party workers at Igatpuri council office. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

भाजपचा आक्रोश, महाराष्ट्राच्या चेरापुंजीत प्यायला पाणीही मिळेना!

इगतपुरी शहरातील लोकप्रतिनिधींची मनमानी थांबवा अशी मागणी केली.

Sampat Devgire

इगतपुरी : सर्वाधिक पाऊस (Heavy Rainfall) व धरणांनी वेढलेल्या इगतपुरी (Igatpuri) शहरात सध्या प्यायला पाणीही मिळत नाही. महाराष्ट्रातील चेरापुंजी असलेल्या या शहरात लोकप्रतिनिधी पाणीही देण्यास असमर्थ ठरलेत. त्यामुळे त्यांची मनमानी थांबवा अशी मागणी भारतीय जनता पक्षाने (BJP) केली आहे. (BJP deemands action against infficient peoples representitives)

इगतपुरी शहरातील समस्या व मागण्यांसाठी भाजप युवा जिल्हा उपाध्यक्ष योगेश चांदवडकर यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शहरातील पटेल चौक येथून या आक्रोश मोर्चाला सुरवात करण्यात आली. मोर्चातील घोषणांमुळे परिसर दणाणून गेला होता.

याप्रसंगी संतप्त मोर्चेकरांनी नगर परिषदेचे कार्यालयीनप्रमुख एम. एस. सोनार यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, की नगर परिषदेने मागील महिन्यात नागरिकांची कोणतीही बैठक अथवा मीटिंग न घेता व नागरिकांना विश्वासात न घेता वृत्तपत्रात नोटीस देऊन पाणीपट्टीत वाढ केली आहे. अद्याप नवीन पाणीपुरवठा योजना सुरू झालेली नाही. भावली धरणाचे पाणी नागरिकांना मिळत नसून मग वाढीव पाणीपट्टी कशासाठी घेतली जात आहे.

पाणीपुरवठा करण्यासाठी इगतपुरीतील सर्व रस्ते खोदून टाकले आहेत ते खड्डे कधी बुजवणार, त्याचप्रमाणे पटेल चौक, आठचाळ, मच्छी मार्केट परिसरातील सर्व नाले कचऱ्याने तुडुंब भरले असून, याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पाणीपुरवठ्याचे पाइप टाकण्यासाठी शहरातील सर्व रस्ते खोदल्यामुळे सर्व रस्त्यांवर माती पसरली आहे. पुढे पावसाळा सुरू होत असून, पावसाळ्यात शहरातील सर्व रस्ते चिखलमय होतील. सध्या इगतपुरीकरांना वेळेवर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा वेळेवर होत नसून तासनतास पाण्याची वाट पाहावी लागत आहे, असे भाजपचे योगेश चांदवडकर यांनी सांगितले.

यावेळी तालुकाध्यक्ष रवींद्र गव्हाणे, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सागर नाठे, जनसेवा प्रतिष्ठानचे किरण फलटणकर, अजित पारख, संतोष बाफणा, रोहन दगडे, हर्ष व्यास, मयूर परदेशी आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी सहभागी झाले होते.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT