Congress-BJP News: नाशिक महापालिका निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. शहराच्या सर्व प्रभागात त्यांनी दावा केला आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील प्रस्थापितांनी त्याला उत्तर देण्याची तयारी केली आहे.
महापालिकेच्या राजकारणात प्रस्थापित नेत्यांना सत्ता कोणाचीही असो त्यात वाटेकरी होण्याचा अनुभव असतो. सध्या काँग्रेस पक्षातील शिल्लक नगरसेवक भाजपला शरण गेले अशी चर्चा पसरली आहे. त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केलेला नाही. मात्र शरीराने काँग्रेस आणि मनाने भाजप अशी त्यांची स्थिती आहे.
भाजप आणि मनसेचे मावळत्या महापालिकेत प्रत्येकी सहा नगरसेवक होते. मनसेच्या काही नगरसेवकांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि भाजप पक्षात प्रवेश केला आहे. मात्र या इच्छुकांना उमेदवारी मिळेलच याची शाश्वती नाही.
भाजप हा महायुतीचा मुख्य घटक पक्ष आहे. या पक्षाचे मावळत्या महापालिकेत ६५ विद्यमान नगरसेवक होते. याशिवाय २४ प्रमुख इच्छुकांनी भाजप प्रवेश केला आहे. या सगळ्यांना उमेदवारी देताना भाजपलाच तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
आगामी निवडणुका तोंडावर असल्याने भाजप पक्षात गेल्यावर उमेदवारीची शाश्वती नाही. त्यामुळे पंचवटीतील काँग्रेसचे दोन नगरसेवक स्थानिक आमदारांसोबत आहे. शरीराने काँग्रेसचे आणि मनाने भाजपचे अशीच त्यांची अवस्था आहे.
या स्थितीचा अचूक अंदाज बांधून काही प्रस्थापितांनी वेगळी समीकरणे आखली आहेत. अल्पसंख्यांक आणि दलित मतदार भाजपला दूर ठेवतात. कितीही प्रयत्न केले तरी ही मते भाजपला मिळण्याची शक्यता नाही.
हा विचार करून शहरातील काँग्रेसचा नगरसेवक असलेल्या एका प्रभागात चक्क भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवारांचा पॅनल उभा राहण्याच्या हालचाली आहे. या ठिकाणी भाजप पडद्याआडच्या समझोत्यातून उमेदवार देण्याचे टाळणार आहे. निवडणुकीनंतर हे नगरसेवक भाजपसोबत जातील.
अशाच घडामोडी भद्रकाली आणि जुने नाशिक भागातील दोन प्रभागांतही सुरू आहेत. प्रदीर्घकाळ स्थायी समितीचे सदस्य असलेल्या आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत या माजी नगरसेवकाकडून भाजपशी तडजोडीच्या हालचाली सुरू आहेत.
यानिमित्ताने महापालिका निवडणुकीत भाजप विरोधी पक्षांतील प्रस्थापित नेत्यांच्या पडद्यामागे वेगळ्या हालचाली आहेत. महापालिकेत विरोधात राहू नये सत्तेची फळे चाखण्यासाठी हा गनिमी कावा अखला जात आहे. त्याला भाजपच्या स्थानिक आमदार आणि संकटमोचकांचा पाठिंबा मिळू शकतो, असा जाणकारांचा दावा आहे.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.